सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरीत एकता दौड
By अरुण आडिवरेकर | Published: October 31, 2022 12:14 PM2022-10-31T12:14:20+5:302022-10-31T12:15:03+5:30
या एकता दौडमध्ये रत्नागिरीमधील नागरिक तसेच अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.
रत्नागिरी : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून सकाळी ७ वाजता रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम येथे हिरवा झेंडा दाखवून या एकता दौडचे शुभारंभ केला. यावेळी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिशित यादव, रत्नागिरीचे प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, मुख्याधिकारी तुषार बाबर, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळ्ये उपस्थित होते.
या एकता दौडमध्ये रत्नागिरीमधील नागरिक तसेच अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. या एकता दौडचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे करण्यात आला.