नगराध्यक्ष निंवडणूक चौरंगी!

By Admin | Published: November 9, 2016 10:33 PM2016-11-09T22:33:34+5:302016-11-09T23:35:52+5:30

रत्नागिरी नगर परिषद : सुमित नागवेकर यांचा नगराध्यक्षपदाचा अर्ज मागे

Election of the Chief Election Commissioner! | नगराध्यक्ष निंवडणूक चौरंगी!

नगराध्यक्ष निंवडणूक चौरंगी!

googlenewsNext

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील मुरडव येथील युवा शेतकरी सुरेश धोंडू सावंत यानी अहिल्याबाई महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या राष्ट्रीय कृ षी विकास योजनेंतर्गत आणलेल्या ४२पैकी १७ शेळ्या अवघ्या १५ दिवसात मृत झाल्याने हा शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. केवळ पशुधन विभागातील अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा आणि मनमानीमुळे या शेतकऱ्याला हा मनस्ताप सोसावा लागल्याचे समोर येत आहे.
मुरडव गावातील मेणेवाडी येथे राहणारे सुरेश धोंडू सावंत (४२) यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही नोकरी नसल्याने ते शेतीकडे वळले. शेतीची आवड होती. मात्र, घरची आर्थिक परिस्थिती असल्याने ते हतबल होते. तरीही ते आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत होता. शेती करता करता ते शेळीपालन व्यवसायाकडे वळले. त्यानी १५ ते २० शेळ्या जमवून आपला व्यवसाय सुरु केला. त्यासाठी शेड बांधून चारा लागवड केली आणि या व्यवसायाची वाढ करण्यासाठी ते धडपड करू लागले.
शासनाच्या राष्ट्रीय कृ षी विकास योजनेंतर्गत लाभार्थींना अहिल्याबाई महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, पुणे यांच्यावतीने ४० शेळ्या व २ बोेकड असा गट देण्यात येतो. त्या योजनेत ५० टक्के अनुदान व ५० टक्के रक्कम लाभार्थीने भरायची असते. या योजनेचा सुरेश सावंत यांनी लाभ घेण्याचे ठरवले. योजनेच्या नियमानुसार तालुका पशुधन विकास अधिकारी मिलिंद नागले यांनी सावंत यांना या योजनेसाठी पात्र ठरवले. अहिल्याबाई होळकर विकास महामंडळाच्या रांजणी येथील फार्मवरील शेळ्या आणण्यासाठी ते सांगलीला घेऊन गेले. तत्पूर्वी सावंत यांनी या योजनेच्या लाभार्थीचा ५० टक्के वाटा म्हणजेच ५६ हजार ५००चा हिस्सा अदा केला होता. या शेळ्या आणण्याचा प्रवासखर्च जवळजवळ २५ हजार इतका आला असून, तोही सावंत यांनीच केला. मात्र, ठरल्याप्रमाणे संस्थेच्या फार्मवरील शेळ्या न देता सांगली येथील एका ठेकेदाराने स्थानिक बाजारातील शेळ्या खरेदी करुन शेतकऱ्याच्या माथी मारल्या.
२० आॅक्टोबर रोजी शेळ्या आणल्यानंतर त्यांचा विमा उतरविण्यात आला. वास्तविक ही बाब खरेदीनंतर तत्काळ होणे गरजेचे होते. त्यानंतर २२ आॅक्टोबरपासून यातील एकेक शेळी दगावण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत १७ शेळ्या दगावल्या असून, त्यांच्यावर हजारो रुपयांची औषधे वापरली गेली. शासकीय औषधाने काहीच फरक पडत नसल्याने स्थानिक बाजारपेठेतून जवळजवळ २० हजार रुपयांची औषधे खरेदी झाली असल्याचे सावंत यांनी सांगितले.
शेळ्यांच्या आजाराचे निदान होत नसल्याचे वक्तव्य तालुका पशुवैद्यकीय अधिकारी मिलिंद नागले यांनी केले असून, संबंधित शेतकऱ्याकडून शेळ्यांचा निवारा व चाऱ्याची चांगली सोय नसल्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्षात ही सर्व व्यवस्था संबंधित अधिकाऱ्यांनी पाहिल्यानंतर शेळ्या खरेदीचा प्रस्ताव पुढे पाठवून मंजुरी दिली जाते. मात्र, आता हे अधिकारी आपला बचाव करण्यासाठी लाभार्थीलाच दोषी ठरवत आहेत.
या सर्व प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई व्हावी व शेतकऱ्याला न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. शेळ्या खरेदी करत असताना त्यांची वैद्यकीय चाचणी होणे गरजेचे होते. त्या शेळ्या रोगट असल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात आले होते. मात्र, आर्थिक साटेलोट्यातून हा व्यवहार घडला असावा? असा आरोप होत आहेत. (वार्ताहर)


तक्रार करूनही शेळ्या माथी मारल्या
यावेळी संगमेश्वर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी मिलिंद नागले यांच्यासह रांजणी येथील प्रक्षेत्र व्यवस्थापक पोपटराव कारंडे हेही समक्ष उपस्थित असल्याचे सावंत यांनी सांगितले. त्याचवेळी संबंधित शेळ्या या रोगी असल्याचे जाणवत होते. म्हणून आपण संबंधित अधिकाऱ्यांच्या ही बाब सांगली येथेच लक्षात आणून दिल्याचे शेतकरी सावंत यांनी सांगितले. मात्र, तरीही या शेळ्या मुरडव येथे आणल्या.व्यवसाय करायला गेले अन् हवालदिल झाले...
उर्वरित शेळ्याही मरणासक्त अवस्थेत आहेत. याची बाधा आपल्या पहिल्या शेळ्यांना होण्याची भीती सावंत यांनी व्यक्त केली आहे. या सर्व भयानक परिस्थितीने सावंत चांगलेच हवालदिल झाले आहेत. विमा कंपनीकडे क्लेम करण्यासाठी मृत झालेल्या १७ शेळ्या परत खरेदी करुन आणण्यासाठी पशुधन विभागाकडून सावंत यांना सांगितले जात आहे.


पशुधन विभागाच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा.
४२ शेळ्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत आणल्या होत्या.
चौकशी करून योग्य त्या कारवाईची मागणी.
अधिकाऱ्यांचे कातडीबचाव धोरण.

Web Title: Election of the Chief Election Commissioner!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.