चिपळुणातील ४१ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 04:00 PM2021-11-27T16:00:10+5:302021-11-27T16:00:36+5:30

४१ ग्रामपंचायतींच्या ६३ जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही नव्या वर्षामध्ये होणार आहेत.

By elections of 41 Gram Panchayats in Chiplun announced | चिपळुणातील ४१ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका जाहीर

चिपळुणातील ४१ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका जाहीर

Next

अडरे : चिपळूण तालुक्यातील रिक्त असलेल्या ४१ ग्रामपंचायतींच्या ६३ जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही नव्या वर्षामध्ये होणार आहे. त्यापूर्वी होणाऱ्या या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांमध्ये राजकीय पक्षांच्या ताकदीचा कस लागणार आहे.

चिपळूण तालुक्यातील नगर परिषदेसह जिल्हा परिषदेच्या निवडणुका याच वर्षी होत आहेत. मार्च २०२२ पर्यंत या निवडणुकांची रणधुमाळी संपणार आहे. चिपळूण तालुक्यातील गाणे, भिले केतकी, देवखेरकी, धामेली, डेरवण, ढाकमोळी, गोंधळे हडकणी, मालदोली, मांंडकी खुर्द, नारदखेरकी, नांदगाव बुद्रुक, नांदगाव खुर्द, निर्वाळ, तलवडे वेळबं, कापरे, नवीन कोळकेवाडी, वडेरू, वाघिवरे, पिलवली तर्फे वेळंब, कोकरे, दुर्गवाडी, फुरुस, कळवंडे, ढोक्रवळी, नांदिवसे, धामणवने, निरबाडे, उभळे, आगरगाव, तनाळी, आंबरेबुद्रुक, तोंडली, पिलवली तर्फे सावर्डे, पेढांंबे, तळसर, तुरंबव, वेहेळे, आंबतखोल, डुगवे, कळमुंडी, खोपड या गावांतील ६३ जागांसाठी ही निवडणूक हाेणार आहे.

प्रशासकीय प्रक्रिया सुरू

पोटनिवडणुकीसाठी मंगळवार, दि. ३० नोव्हेंबर ते सोमवार, दि. ६ डिसेंबर या कालावधीत उमेदवार अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. दाखल अर्जांची छाननी मंगळवार, दि. ७ डिसेंबर, गुरुवार, दि. ९ डिसेंबरपर्यंत उमेदवार अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तर मंगळवार, दि. २१ डिसेंबर रोजी मतदान, तर २२ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

Web Title: By elections of 41 Gram Panchayats in Chiplun announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.