पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी इलेक्ट्रिक कारने भारत भ्रमण
By मनोज मुळ्ये | Published: November 4, 2023 10:27 AM2023-11-04T10:27:58+5:302023-11-04T10:28:39+5:30
पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक कार आणि सोलर एनर्जीच्या प्रसारासाठी त्याने हे भारत भ्रमण सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : प्रदूषण ही आजची मोठी समस्या आहे त्यात वाहनांमुळे होणारे प्रदूषण सर्वात अधिक आहे गाड्यांची वाढती संख्या लक्षात घेता हे प्रमाण अजून वाढण्याची भीती आहे त्यामुळे पर्यावरण पूरक वाहतूक व्यवस्था आणि सौर ऊर्जेचा प्रसार करण्यासाठी एक तरुण इलेक्ट्रिक कार घेऊन भारत भ्रमण करत आहे आतापर्यंत ५४ दिवसात तब्बल आठ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून हा तरुण आता कोकणात आला आहे सुनील रेड्डी असे त्याचे नाव असून तो हैद्राबाद येथील आहे.
सुनीलने १२ सप्टेंबरला मुंबईहून आपला प्रवास सुरू केला. पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक कार आणि सोलर एनर्जीच्या प्रसारासाठी त्याने हे भारत भ्रमण सुरू केले आहे.
१२ सष्टेंबरपासून त्यांने मुंबईतून इलेक्ट्रिक कारसोबत भारत भ्रमणाचा प्रवास सुरु केला. मुंबईतून इंदोर, जयपूर, कानपूर, जबलपूर, दिल्ली आणि गोवा असा प्रवास करत हा ३१ वर्षीय तरुण कोकणात आलाय. आयआयटी इंजिनिअर असलेल्या हा तरुणाने आतापर्यंत या ८ हजार किलोमिटरचा प्रवास पूर्ण केला आहे.