कोंढे गावात विजेचा खेळखंडोबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:36 AM2021-07-14T04:36:48+5:302021-07-14T04:36:48+5:30
चिपळूण : भारनियमन नसतानाही चिपळूण तालुक्यातील कोंढे गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित होऊ लागला आहे. तासन्स वीज गायब होत असल्याने ...
चिपळूण : भारनियमन नसतानाही चिपळूण तालुक्यातील कोंढे गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित होऊ लागला आहे. तासन्स वीज गायब होत असल्याने कोविड रुग्ण, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शनिवारी दुपारी तर तब्बल चार ते पाच तास वीज गेल्याने गावकर्यांचे प्रचंड हाल झाले. ग्रामस्थांच्या तक्रारींकडे अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्यानेच हे प्रकार वारंवार घडत असून, महावितरण व्यवस्थापनाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. कोंढे गावात सद्य:स्थितीत वीसहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. हे सर्व रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. घरातील एका रूममध्ये ते क्वाॅरण्टाइन आहेत. अशा परिस्थितीत दिवस-रात्र वारंवार विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने रुग्ण उकाड्याने हैराण झाले आहेत.