रत्नागिरीत २३ कोटींचे वीजबिल थकले, आता भारनियमनाचे चटके?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 01:48 PM2024-02-27T13:48:27+5:302024-02-27T13:48:43+5:30

रत्नागिरी : महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिल भरले जात नसल्याने थकबाकीची रक्कम वाढत चालली आहे. जिल्ह्यातील एक लाख पाच हजार ३९३ ...

Electricity bill of 23 crores is exhausted in Ratnagiri | रत्नागिरीत २३ कोटींचे वीजबिल थकले, आता भारनियमनाचे चटके?

रत्नागिरीत २३ कोटींचे वीजबिल थकले, आता भारनियमनाचे चटके?

रत्नागिरी : महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिल भरले जात नसल्याने थकबाकीची रक्कम वाढत चालली आहे. जिल्ह्यातील एक लाख पाच हजार ३९३ ग्राहकांकडे २३ कोटी ८८ लाखांची थकबाकी आहे. ही थकबाकी वेळेत वसूल न झाल्यास महावितरणच्या निकषानुसार ग्राहकांना भारनियमनाचे चटके साेसावे लागण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी पथदीप ग्राहकांची आहे. पथदीपची १,६९० स्थानिक स्वराज्य संस्थाकडे ६ कोटी ८६ लाख रुपये थकबाकी आहे. थकबाकी भरण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडेही पाठपुरावा सुरू आहे. त्यापाठोपाठ ८२,३४५ घरगुती ग्राहकांकडे ६ कोटी ५० लाखांची थकबाकी आहे. वाणिज्यिक, कृषी, सार्वजनिक पाणीपुरवठा, औद्योगिक ग्राहकांकडेही कोट्यवधींची थकबाकी आहे.

महावितरणकडून फिडरनिहाय भारनियमन केले जाते. ज्या फिडरवर थकबाकीचे प्रमाण अधिक, विजेची चोरी, वीज गळती या निकषांच्या आधारे भारनियमन करण्यात येते. सध्या जिल्ह्यातही वीजचोरी, आकडा टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच वीजबिल न भरण्याची मानसिकता वाढत आहे. त्यामुळे भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यातही वर्गवारीनुसार भारनियमनाचे चटके साेसावे लागण्याची शक्यता आहे.

वीजबिल वेळेवर न भरल्यामुळे थकबाकी वाढली आहे. आर्थिक वर्ष समाप्ती आहे. त्यामुळे ग्राहकांनी वापरलेल्या विजेची बिले वेळेवर भरून महावितरणला सहकार्य करावे. अन्यथा वसुली पथकाला कारवाई करणे भाग पडेल. कारवाई टाळण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन यापैकी सोयिस्कर पर्यायाचा अवलंब करावा. - स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंता, रत्नागिरी

घरगुती
ग्राहक : ८२,३४५
थकबाकी : ६ कोटी ५० लाख

वाणिज्यिक
ग्राहक ८२७६
थकबाकी - २ कोटी ४४ लाख

औद्योगिक
ग्राहक : ७९६
थकबाकी एक कोटी ८ लाख

कृषी पंप
ग्राहक : ८४३२
थकबाकी २ कोटी ८५ लाख

पथदीप
ग्राहक : १६९०
थकबाकी ६ कोटी ८६

सार्वजनिक पाणीपुरवठा
ग्राहक ११७५
थकबाकी २ कोटी ५५

- एकूण ग्राहक १,०५,३९३
थकबाकी २३ कोटी ८८


चिपळूण विभाग
ग्राहक २७,१७७
थकबाकी ५ कोटी ४० लाख

खेड विभाग
ग्राहक २९,८६०
थकबाकी ७ कोटी २१ लाख

रत्नागिरी विभाग
ग्राहक ४८,३५६
थकबाकी २३ कोटी ८८ लाख

Web Title: Electricity bill of 23 crores is exhausted in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.