नागरिकत्व कायद्याविरोधात खेडमध्ये एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 11:13 AM2019-12-24T11:13:30+5:302019-12-24T11:15:08+5:30
केंद्र शासनाच्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सोमवारी खेडमध्ये मुस्लिम बांधवांनी एल्गार केला. रिजेक्ट सीसीए आणि बायक्वॉट एनआरसी असे फलक घेतलेले हजारो युवक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. ह्यतानाशाई नहीं चलेगीह्ण या घोषणेने खेड प्रांत कार्यालय परिसर दणाणून गेला होता. या मोर्चामध्ये खेड तालुक्यातील सुमारे पाच हजार मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.
खेड : केंद्र शासनाच्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सोमवारी खेडमध्ये मुस्लिम बांधवांनी एल्गार केला. रिजेक्ट सीसीए आणि बायक्वॉट एनआरसी असे फलक घेतलेले हजारो युवक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. ह्यतानाशाई नहीं चलेगीह्ण या घोषणेने खेड प्रांत कार्यालय परिसर दणाणून गेला होता. या मोर्चामध्ये खेड तालुक्यातील सुमारे पाच हजार मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.
खेडमध्ये सोमवारी सकाळी ११ वाजता मदिना चौकातून हा मोर्चा निघाला. पोत्रिक मोहल्ला, साठे मोहल्लामार्गे हा मोर्चा तीनबत्तीनाका येथे पोहोचला. याठिकाणी जिजामाता उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रातांधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
सीसीए कायदा रद्द करण्यात यावा, तर एनआरसीवर बहिष्कार घाला, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने खेडचे प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांना निवेदन सादर केले.मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खेड पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती.