सांडपाण्याची समस्या दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:21 AM2021-06-19T04:21:42+5:302021-06-19T04:21:42+5:30
रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे ग्रामस्थांनी श्रमदान करून रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्याची गंभीर समस्या सोडविली आहे. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी बंदिस्त गटारे ...
रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे ग्रामस्थांनी श्रमदान करून रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्याची गंभीर समस्या सोडविली आहे. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी बंदिस्त गटारे बांधण्याची मागणी कोतवडे उंबरवाडी ग्रामस्थांकडून केली जात होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आता स्वत:च ही मोहीम राबविली आहे.
पोलिसांना छत्री वाटप
गुहागर : येथील गुहागर प्रतिष्ठानतर्फे पावसात उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना छत्रीचे वाटप केले आहे. हे प्रतिष्ठान मुंबई, विरार, नालासोपारा, वसई ते गुहागरपर्यंत विविध उपक्रम राबवत असते. त्यात आरोग्यविषयक, शैक्षणिक, क्रीडा तसेच सामाजिक उपक्रमांचा समावेश आहे.
लसीकरणात पुढे
चिपळूण : तालुक्यात अजूनही ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षांवरील अनेक नागरिकांचे लसीकरण राहिलेले आहे. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता अधिकाधिक नागरिकांना या लसीकरणाचा लाभ मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी आता अनेक ग्रामपंचायती लसीकरण मोहीम गावांमध्ये राबविण्यासाठी पुढे येत आहेत.
मंडळातर्फे जेवण
चिपळूण : तालुक्यातील खेर्डी येथील विठ्ठलवाडी गणेश मित्रमंडळातर्फे गावातील संस्थात्मक विलगीकरण कक्षात मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे. या मंडळाने गरजू व्यक्तींना यापूर्वीही मदतीचा हात दिला आहे. गेल्यावर्षी या मंडळाने गरजू लोकांना अन्नधान्याचे कीटचे वाटप केले होते. गरीब रुग्णांनाही मदत केली आहे.
वायरमनची शोधाशोध
चिपळूण : शहरालगतच्या मिरजोळी गावाला सध्या वायरमन शोधावा लागत आहे. या गावामध्ये वायरमन नसल्याने ऐन पावसाळ्यात सातत्याने सुरू असलेल्या वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या गावात वायरमन नियुक्त करावा, अशी मागणी होत आहे.