धुळीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:28 AM2021-04-26T04:28:22+5:302021-04-26T04:28:22+5:30

ग्रामस्थांची कुचंबणा गुहागर : गुहागरातून ठराविकच एस. टी. बसेस सुटत असल्याने आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांची कुचंबणा होत आहे. किराणा मालासह ...

Empire of Dust | धुळीचे साम्राज्य

धुळीचे साम्राज्य

Next

ग्रामस्थांची कुचंबणा

गुहागर : गुहागरातून ठराविकच एस. टी. बसेस सुटत असल्याने आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांची कुचंबणा होत आहे. किराणा मालासह इतर जीवनावश्यक वस्तूंसाठी वणवण भटकावे लागत आहे. एस. टी. बसेसची संख्या ठराविकच असल्याने प्रवास करणे कठीण झाले आहे. त्यातच दुकानांच्या ठराविक वेळा असल्याने दुहेरी त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्याची दुरवस्था

रत्नागिरी : रेल्वे स्टेशनकडून मुख्य रस्त्यांची चाळण झाली आहे. मोठमोठे खड्डे असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी हे खड्डे चटकन लक्षात येत नाहीत. लॉकडाऊनच्या काळात रस्ता दुरुस्तीची मागणी वाहनचालकांतून होत आहे.

चर बुजविण्याची मागणी

रत्नागिरी : शहरात सध्या गॅस पाईपलाईनसह इतर कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. रस्त्यालगत आणि रस्त्याच्या मधून पाईपसाठी चर खोदण्यात आले आहेत. मात्र चर व्यवस्थितरीत्या बुजविलेले नाहीत, शिवाय वाहनचालकाला त्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने वाहने आपटत आहेत. चर त्वरित व्यवस्थितरीत्या बुजवावेत, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.

मोफत लाकूड पुरवठा

दापोली : कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी दापोली नगरपंचायतीकडून मोफत लाकूड पुरवठा करण्यात येणार आहे. अंत्यविधीसाठी नगरपंचायतीतर्फे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे.

लसीकरणाची प्रतीक्षा

रत्नागिरी : तालुक्यातील पावस प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणाची लस उपलब्ध होण्याची प्रतीक्षा केली जात आहे. ही लस तातडीने उपलब्ध करण्याची मागणी केली जात आहे. प्रथम डोस घेतलेल्या ग्रामस्थांना दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

लाॅकडाऊनला चांगला प्रतिसाद

देवरूख : संगमेश्वर तालुक्यात कोरोना रोखण्यासाठी ग्रामपंचायत तसेच आरोग्य विभागातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. संगमेश्वर बाजारपेठेत सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर शुकशुकाट पसरला आहे.

देवळेकर यांचे यश

राजापूर : तालुक्यातील जुवाठी येथील अक्षरमित्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे घेण्यात आलेल्या ध्वनिमुद्रित पुस्तक वाचन स्पर्धेत नथुराम तानाजी देवळेकर (रत्नागिरी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून अक्षरमित्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक केंद्रातर्फे स्पर्धा घेण्यात आली होती.

संभाषणवर्गाचा समारोप

रत्नागिरी : डी. बी. जे. महाविद्यालयाच्या भाषा-अध्ययनकेंद्र, संस्कृत विभाग व संस्कृत भारती, कोकण प्रांत आयोजित ऑनलाईन संस्कृत संभाषणवर्ग समारोप कार्यक्रम गुगल मीटच्या माध्यमातून झाला.

पीपीई कीटस् मोफत मिळणार

खेड : तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय मृतांची आकडेवारीही वाढत असल्याने गरजू लोकांसह अंत्यविधीसाठी लागणारे पीपीई कीटस्, मास्क, हॅण्डग्लोज माजी आमदार संजय कदम व महेश गणवे यांच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

Web Title: Empire of Dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.