चौपदरीकरणासाठी सावर्डे बाजारपेठ हटविली, भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 06:16 PM2019-03-05T18:16:35+5:302019-03-05T18:17:39+5:30
मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरु असून सावर्डे परिसरात भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामासाठी सावर्डे बाजारपेठ हटविण्यात आली आहे.
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरु असून सावर्डे परिसरात भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामासाठी सावर्डे बाजारपेठ हटविण्यात आली आहे.
सावर्डे बाजारपेठेतील घरे, दुकाने हटविण्यात आली आहेत. या बाजारपेठेत नेहमीच वर्दळ असायची. महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असताना चिपळूणनंतर सावर्डे बाजारपेठ ही तितकीच महत्त्वाची आहे. विविध शैक्षणिक संस्था, डेरवण हॉस्पीटलमुळे सावर्डे भागाला वेगळे स्थान प्राप्त झाले आहे.
सावर्डे पंचक्रोशीतील गावांसाठी हे ठिकाण व्यापार व खरेदीसाठी केंद्रबिंदू बनले आहे. दर रविवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. ग्रामीण भागातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी करण्यासाठी नागरिक येत असतात.
महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या अंतर्गत कारवाई सुरु करण्यात आली असल्याने सावर्डे बाजारपेठ उध्वस्त झाली आहे. व्यावसायिक व खोकेधारकांना यापूर्वी हटविण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. शनिवारी व रविवारी पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली. यावेळी व्यापारी व नागरिकांनी सामंजस्यपणे आपले बांधकाम हटविले.