सेंद्रीय शेतीमुळे होतेय पर्यावरणाचेही रक्षण

By admin | Published: February 23, 2015 09:56 PM2015-02-23T21:56:50+5:302015-02-24T00:00:50+5:30

शंकरराव राऊत : सेंद्रीय शेती विकास परिषदेचे उद्घाटन

Environmental protection due to organic farming | सेंद्रीय शेतीमुळे होतेय पर्यावरणाचेही रक्षण

सेंद्रीय शेतीमुळे होतेय पर्यावरणाचेही रक्षण

Next

सावंतवाडी : सेंद्रीय शेतीमुळे जमिनीची पत राखली जातानाच पर्यावरणाचे रक्षणही होते. तसेच जनतेला प्रदूषणमुक्त अन्न मिळते. त्यामुळे सेंद्रीय शेतीचा प्रयोग अद्वितीय ठरतो. या शेतीच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध असून, चांगला नफा मिळतो. त्यामुळे प्रत्येकाने सेंद्रीय शेती व खत निर्मिती करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे सेंंद्रीय शेती धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. शंकरराव राऊत यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा आॅरगॅनिक फार्मर्स फेडरेशन आयोजित सेंद्रीय शेती विकास परिषद उद्घाटन सोमवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. त्यानंतर दुपारच्या सत्रात सेंद्रीय शेती धोरणावर डॉ. राऊत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब परूळेकर, उपाध्यक्ष कृष्णा मोरजकर, उपविभागीय कृषी अधिकारी आर. जी. फाटक, कोकम क्लस्टर संस्थापक डॉ. आनंद तेंडुलकर, सेंद्रीय शेतीतज्ज्ञ प्रशांत नायकवाडी, वितरण व्यवस्थापनतज्ज्ञ सचिन पालकर, भाजीपाला व्यवस्थापन सुरेश परब, सेंद्रीय खतेतज्ज्ञ सचिन दळवी, सचिव रामानंद शिरोडकर, कोषाध्यक्ष रणजीत सावंत, रमाकांत मल्हार, अभिमन्यू लोंढे, बाजीराव झेंडे, धनंजय गावडे, सुरेंद्र पवार आदी उपस्थित होते. सेंद्रीय शेती जमीन आणि माणसाला आरोग्यदायी आहे. सेंद्रीय शेती, फळे, भाजीपाला यांना आज शहरात मागणी आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजना आहेत. शेतीचे धोरण ठरविताना उत्पादन आणि विक्री यांचे अर्थकारणही शेतकऱ्यांनीच सांभाळावेत, असे डॉ. राऊत यांनी सांगितले. यावेळी डॉ. आनंद तेंडुलकर यांनी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी व समूह गट यांची माहिती दिली. ते म्हणाले, वेखंडाचे मिश्रण आंब्याच्या झाडावर फवारणी केल्यास उत्पन्न चांगले मिळते. आज रासायनिक खते व कीटकनाशकांनी अन्न प्रदूषित मिळत असल्याने आजारही बळावत आहेत. त्यामुळे सेंद्रीय शेतीत शेतकऱ्यांनी दडलेल्या अर्थकारणाचा लाभही घ्यावा. सेंद्रीय शेती उत्पादने व प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, असे सांगितले. प्रशांत नायकवाडी म्हणाले, तुम्ही सेंद्रीय शेती करत असला, तरी प्रमाणिकरणाला फार महत्त्व आहे. आज १२८ देशात सेंद्रीय शेतीला महत्त्व दिले जात आहे. सेंद्रीय शेतीमुळे जमीन जिवंत होते. त्यामुळे इको-फ्रेंडली निसर्ग व शेतजमीन, प्राणी व भूतल बनतो. रासायनिक खतांचे दुष्परिणाम जगासमोर आले आहेत. त्यामुळे सेंद्रीय शेतीला प्राधान्य देताना थर्टी पार्टी सर्टिफिकेशन व जीपीएस प्रमाणिकरणाला प्राधान्य दिले पाहिजे. त्यांच्या प्रमाणिकरणावर बाजारपेठा अवलंबून आहेत, असे नायकवाडी यांनी स्पष्ट केले. आरवली येथील सचिन दळवी म्हणाले, देशी गाईच्या मूत्र व शेणाला फार महत्त्व आहे. गांडूळ खत हा सेंद्रीय शेतीचा आत्मा आहे. मी नोकरी सोडून सेंद्रीय शेतीला प्राधान्य देताना सेंद्रीय खत निर्मिती केली. आज मी ४० टन गांडूळ खत निर्माण करीत असून, माझ्या शेतीच्या वापराच्या पलिकडचे खत विकत आहे. यावेळी सेंद्रीय शेती परसबागेबाबत रमाकांत मल्हार, तर सेंद्रीय शेती व्यवस्थापनाबाबत बाळासाहेब परूळेकर यांनी माहिती दिली. (वार्ताहर)

Web Title: Environmental protection due to organic farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.