पर्यावरण रक्षण, कोरोनामुक्तीचे लक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:23 AM2021-06-05T04:23:20+5:302021-06-05T04:23:20+5:30

‘पर्यावरण’ म्हणजे आपल्या आजूबाजूला असणारे वृक्ष, प्राणी, पक्षी, हवा, जमीन यासारख्या आपल्या जीवनावर परिणाम करणाऱ्या सर्व गोष्टी. पर्यावरणातून मानव ...

Environmental protection, a sign of coronation | पर्यावरण रक्षण, कोरोनामुक्तीचे लक्षण

पर्यावरण रक्षण, कोरोनामुक्तीचे लक्षण

googlenewsNext

‘पर्यावरण’ म्हणजे आपल्या आजूबाजूला असणारे वृक्ष, प्राणी, पक्षी, हवा, जमीन यासारख्या आपल्या जीवनावर परिणाम करणाऱ्या सर्व गोष्टी. पर्यावरणातून मानव मूलभूत गरजांची पूर्तता करून जीवनावश्यक गोष्टी (फळे, फुले, अन्न, पाणी, लाकूड आणि इंधन इत्यादी) मिळवतो. तसे पाहिले तर मानव आणि पर्यावरण यांचा प्राचीन काळापासून संबंध आहे. प्राचीन काळापासून मानवाने प्लास्टिकसारख्या व इतर चैनीच्या वस्तू बनवून पर्यावरणाची हानी केली आहे. अमेरिकेतील शास्त्रज्ञांच्या मते कोरोनाचा हा विषाणू चिनी शास्त्रज्ञांनी ‘युहान’ येथील प्रयोगशाळेत तयार केला आहे. त्या शास्त्रज्ञांच्या मतानुसार हा विषाणू जर मानवनिर्मित असेल तर मात्र पृथ्वीवर मानवाप्रमाणे इतर प्राण्यांचा मृत्यू कोरोनाने झाल्याने पर्यावरणाची मोठी हानी या कोरोनाने सुद्धा झाली आहे. कोरोनामुळेच निसर्गप्रेमी असणाऱ्या बहुगुणा यांचाही मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत महाराष्ट्रातील एक लाख, भारतामधील साडेतीन लाख तर जगामधील छत्त्तीस लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीनुसार जणू पृथ्वीवरील जीवसृष्टीच धोक्यात आली आहे.

पर्यावरणामध्ये मानव हाच सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. असे असले तरीही पर्यावरणाची मोठी हानीसुद्धा मानवानेच केली आहे. यापूर्वी प्लेगसारख्या किंवा इतर अनेक महामारीने पर्यावरणाचा समतोल ढासळल्याचे मानवाने अनुभवले आहे. सध्या तर कोरोना महामारीने संपूर्ण विश्वातच थैमान घातले आहे. कोरोनाबाधित लोक ऑक्सिजन बेडअभावी आपले जीवन संपवताहेत. तसेच गंगा व यमुना नदीकिनारी फेकलेल्या कोरोनाबाधित प्रेतांमुळे पर्यावरणामध्ये दुर्गंधी पसरुन पर्यावरणाची हानी झाली आहे. त्याचप्रमाणे ग्लोबल वॉर्मिंग, मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड, विविध इंधनांचा अतिवापर, टॉक्सिक केमिकलने मरणारे कीटक व मधमाशा, समुद्रातील वाढत चाललेले प्रदूषण तसेच समुद्रातील नष्ट होणारी जैवविविधता या सर्व बाबींमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.

आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने कोरोनामुक्ती करून पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे हे आपले आद्यकर्तव्य बनले आहे. पर्यावरण रक्षणासाठी आपण वृक्षलागवड करणे, औषधी वनस्पतींची लागवड करणे, जंगलांचे संरक्षण करणे, सौरऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देणे, ग्लोबल वॉर्मिंग याविषयी जनजागृती करणे, फुलपाखरांना मिल्कवीड प्लांट्स लागवड करणे, आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे समस्यांचे निराकरण करणे या व इतर अनेक बाबींचे अनुकरण करणे गरजेचे आहे. कोरोना टाळेबंदीमुळे अनेक जागतिक शहरांची प्रदूषण पातळी खाली आली आहे. कोरोनामुक्त महाराष्ट्र राज्य करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, टास्क फोर्स, डॉक्टर, परिचारिका, पोलीस, शिक्षक कोविड योद्ध्यांची भूमिका बजावत आहेत. हे सर्व पर्यावरणाचे जणू रक्षक आहेत. त्याप्रमाणे आपण पर्यावरणाचे रक्षण केल्यास या जागतिक पर्यावरण दिनी ते कोरोनामुक्तीचे लक्षण ठरू शकेल. संपूर्ण विश्वच कोरोनामुक्त होऊ शकेल.

- प्रा. हनुमंत लोखंडे, आडिवरे हायस्कूल, राजापूर

Web Title: Environmental protection, a sign of coronation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.