जिल्ह्यात ६६३ टन कचऱ्याचे निर्मूलन
By admin | Published: November 17, 2014 10:37 PM2014-11-17T22:37:24+5:302014-11-17T23:20:27+5:30
स्वच्छ भारत, सुंदर भारत : धर्माधिकारी प्रतिष्ठानने घेतली हाती झाडू
शोभना कांबळे - रत्नागिरी --देशभरात सुरू झालेल्या ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’ मोहिमेंतर्गत स्वच्छता दूत म्हणून कार्य करणाऱ्या नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी यांना सोबत घेऊन रविवारी जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात जिल्ह्यातून एकूण ६६३ टन कचरा संकलीत करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हा उपक्रम धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत राबविण्यात आला. विशेष म्हणजे धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अनुयायी यामध्ये स्वेच्छेने सामील झाले होते. शहरामध्ये गट तयार करून या गटांच्या माध्यमातून परिसरातील स्वच्छतेवर भर देण्यात आला. या स्वच्छता अभियानात श्री सदस्यांबरोबर स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग, लोकप्रतिनिधी, नागरिक यांचा समावेश होता.
सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत राबविलेल्या या अभियानात शहरातील निवडलेल्या भागातील स्वच्छता करण्यात आली.
मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या शहरांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. राजापूर आणि चिपळूण येथील नद्यांमधील गाळही काढण्यात आला. चिपळूण येथील वाशिष्ठी नदीतील सुमारे ३० डंपर गाळ काढण्यात आला.
यावेळी देवरूख शहरात ही मोहीम राबविण्यात आली नाही. पुढच्या वेळी हे शहर या मोहिमेत घेतले जाणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील एकूण ९३४३ श्री सदस्य सहभागी झाले होते. या प्रमुख आठ शहरांचा मिळून एकूण ६६३.१३ टन कचरा संकलीत करण्यात आला. सर्वाधिक कचरा दापोली आणि राजापुरात संकलीत करण्यात आला. यासाठी संबंधित नगरपालिका, नगरपंचायतीतर्फे वाहने पुरविण्यात आली होती. संकलीत केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट योग्यरित्या लावण्यात आली.
पहिल्या टप्प्यात नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे शहरांमध्ये स्वच्छता करण्यात आली. आता थोड्या दिवसांनी ग्रामीण भागातही स्वच्छता मोहीम राबविली जाणार असल्याचे प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले. प्रतिष्ठानतर्फे राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमांचे नागरिकांमधून कौतुक करण्यात येत आहे.
तालुकाकार्यकर्तेकचरावाहने
मंडणगड११९६२९१०
दापोली१९७६२३४३३
खेड२१७३.९३५५
चिपळूण१९००९०३३
गुहागर८३८१५२०
रत्नागिरी३०००१०२५२
लांजा१९१२७.५८
राजापूर८२५१६१.७१५
एकूण९३४३६६३.१४१७६
जिल्ह्यातील एकूण ९३४३ श्री सदस्य सहभागी.
प्रमुख आठ शहरांचा मिळून एकूण ६६३.१३ टन कचरा संकलित.
सर्वाधिक कचरा दापोली आणि राजापुरात संकलीत.
नगरपालिका, नगरपंचायतीतर्फे वाहनांचा पुरवठा.
ग्रामीण भागातही स्वच्छता राबवण्याचा संकल्प.