कुष्ठरोग निर्मूलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:39 AM2021-07-07T04:39:25+5:302021-07-07T04:39:25+5:30
देवरुख : राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन उपक्रमांना तालुक्यात प्रारंभ झाला आहे. ३१ मार्च २०२२ पर्यंत हा कार्यक्रम ...
देवरुख : राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन उपक्रमांना तालुक्यात प्रारंभ झाला आहे. ३१ मार्च २०२२ पर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. यात कुष्ठरोगाची लक्षणे असलेल्यांचा शोध घेणे तसेच त्यांच्यावर उपचार करणे हा उपक्रम राबविला जाणार आहे. यासाठी तालुक्यातील ७३,१६१ लोकसंख्या निवडण्यात आली आहे.
पावसाची विश्रांती
राजापूर : या आठवड्यात पावसाने पाठ फिरवली आहे. अधूनमधून किरकोळ सरी वगळता पावसाने विश्रांती घेण्यास सुरुवात केली आहे. रात्री मोठ्या सरी कोसळतात. परंतु दिवसभर ऊन पडलेले असते. ग्रामीण भागातील लावणीच्या कामाला पावसाच्या लहरीपणामुळे खीळ बसली आहे.
लसची प्रतीक्षा
रत्नागिरी : जिल्ह्यातील केवळ साडेतीन लाख लोकांनाच आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस मिळाला असून ८५ हजार लोकांना दुसरा डोस मिळाला आहे. जिल्ह्यात १३ लाख १५ हजार एवढे १८ वर्षावरील नागरिकांची संख्या आहे. मात्र त्यापैकी अजूनही १ लाख लोकसंख्येला दुसरा डोस मिळालेला नाही. त्यामुळे सध्या केवळ लसचीच प्रतीक्षा करावी लागत आहे.
बेफिकिरी वाढली
मंडणगड : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. मात्र यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा बेफिकिरी वाढल्याचे चित्र दिसत आहे. अजूनही काही जण मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या कमी झाली असली तरीही अशा बेफिकीर लोकांमुळे संसर्ग वाढण्याचा धोका व्यक्त होत आहे.
प्रतीक्षा वाढली
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची टक्केवारी ५ पर्यंत आली आहे. त्यामुळे पॉझिटीव्हीटी रेट कमी झाल्याने जिल्हा प्रशासन निर्बंध शिथिल करेल असा दिलासा व्यापाऱ्यांना वाटू लागला आहे. परंतु अजूनही जिल्हा प्रशासनाकडून याबाबत कुठल्याच सूचना आल्या नाहीत. त्यामुळे दुकाने सुरू कधी करायची, असा प्रश्न या व्यापाऱ्यांना पडला आहे.