एस्. टी. बसमधील वायफाय सेवेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 03:35 PM2017-07-30T15:35:30+5:302017-07-30T15:40:30+5:30

देवरूख : प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एस. टी. बसमध्ये ग्राहकांना मोफत वायफाय सेवा देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला.

esa-tai-basamadhaila-vaayaphaaya-saevaecaa-baojavaaraa | एस्. टी. बसमधील वायफाय सेवेचा बोजवारा

एस्. टी. बसमधील वायफाय सेवेचा बोजवारा

Next
ठळक मुद्देजाहीरातींचे लावलेले फलक फसवे सेवा मिळत नसल्याची प्रवाशांची ओरडयंत्रणेकडून दिरंगाई होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे

देवरूख : प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एस. टी. बसमध्ये ग्राहकांना मोफत वायफाय सेवा देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. निर्णय झाल्यावर अनेक बसेसमध्ये वायफाय सेवा असलेली बस असल्याचे फलक लावण्यात आले. शिवाय वायफायचे इन्स्ट्रुमेण्ट बसवण्यात आले. परंतु एस. टी.च्या प्रवाशांना वायफाय सेवा मिळत नसल्याची प्रवाशांची ओरड आहे.

एस. टी. बसमध्ये वायफाय सेवा सुरू असल्याचे जाहीरातींचे लावलेले फलक फसवे असल्याचा प्रवाशांचा अनुभव आहे.

एस. टी.मध्ये वायफाय सेवा सुरू करून प्रवाशांना आकर्षित करण्याचा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचा प्रयत्न आहे. एस. टी. बसेसमध्ये कार्यान्वित करण्याची जबाबदारी ज्या यंत्रणेवर सोपवण्यात आली, त्यांच्याकडून दिरंगाई होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

कॉईन बॉक्सच्या जमान्यात मोठा गाजावाजा करत एस. टी.ने बसेसमध्ये कॉईन बॉक्स बसवले होते. परंतु कॉईन बॉक्सवरून कुठल्याही ग्राहकाचा केव्हा कॉलच लागला नसल्याचा इतिहास आहे. परिणामी ते कॉईन बॉक्स काढून टाकावे लागले.

सध्या वायफायच्या जमान्यात बसेसमध्ये वायफायची इन्स्ट्रुमेंट लावून प्रवाशांना आकर्षित करण्याचे गाजर दाखवले आहे. मनोरंजन, मस्ती और धमाल, आपका मोबाईल आपका थिएटर आदी बोगस जाहीराती लावण्यात आल्या आहेत.
शिवाय वायफाय नेटवर्क आपल्या मोबाईलसाठी कसे कार्यान्वित करावे, यासाठी सूचना फलकही लावण्यात आले आहेत. त्यामध्ये आरामात बसा व चित्रपट आणि कार्यक्रमांचा आनंद आपल्या मोबाईलमध्ये लुटा, असे लिहिण्यात आले आहे.
परंतु ज्याठिकाणी सेवाच मिळत नाही तिथे या जाहिरातींचे फलक काय कामाचे? असा सवाल प्रवाशांमधून विचारला जात आहे. जाहिरातींचे जे फलक लावण्यात आले आहेत, त्यामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी स्टीकर लावण्यात आले आहेत. ते काढताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी ताकीदही देण्यात आली आहे.

Web Title: esa-tai-basamadhaila-vaayaphaaya-saevaecaa-baojavaaraa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.