कोविड सेंटरला अत्यावश्यक साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:21 AM2021-07-09T04:21:07+5:302021-07-09T04:21:07+5:30
राजापूर : राजापूर तालुका माध्यमिक अध्यापक संघातर्फे कोविड निर्मूलनासाठी वैद्यकीय उपकरणांची मदत प्रशासनाला करण्यात आली आहे. रायपाटण येथील कोविड ...
राजापूर : राजापूर तालुका माध्यमिक अध्यापक संघातर्फे कोविड निर्मूलनासाठी वैद्यकीय उपकरणांची मदत प्रशासनाला करण्यात आली आहे. रायपाटण येथील कोविड सेंटरला बायपॅक मशीन व तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य सेंटरला ९ बेडसाईड लॉकर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
हॉटेल्स सुरु करण्याची मागणी
रत्नागिरी : पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता गणपतीपुळे तसेच रत्नागिरी जिल्हा, तालुका आणि शहरातील हॉटेल व्यावसायिक, रिसॉर्ट, लॉज व्यावसायिकांना कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळून रायगड जिल्ह्याच्या धर्तीवर सुरू करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे.
शासकीय निवासस्थानात अस्वच्छता
रत्नागिरी : जिल्ह्याला स्वच्छतेचे डोस पाजणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींच्या निवासस्थानाच्या परिसरात मात्र अस्वच्छतेने कळस गाठला आहे. त्यामुळे या परिसरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
जिल्ह्यात अधिकारी प्रतिनियुक्तीवर
रत्नागिरी : जिल्ह्यात विविध शासकीय कार्यालये असून, अनेक ठिकाणी प्रभारींकडे कारभार सोपविण्यात आला आहे. काही महत्त्वाचे अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर काढण्यात आले आहे. तर दुसऱ्या जिल्ह्यात काम न करणाऱ्यांना रत्नागिरी जिल्हा पर्याय म्हणून दिला जातो. त्याबद्दल जनतेमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.
परिवहन मंत्र्यांकडे मागणी
राजापूर : जैतापूर येथून सुटणारी जैतापूर - सांगली बसफेरी सुरु करण्याची मागणी जैतापूर ग्रामपंचायतीचे सदस्य व राजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सरफराज काझी यांनी परिवहन मंत्री व पालकमंत्री अनिल परब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.