काेविडच्या पार्श्वभूमीवर शिरगावात निराधार फाऊंडेशनची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:23 AM2021-06-06T04:23:52+5:302021-06-06T04:23:52+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लोकांची काळजी घेण्याच्या उद्देशाने शिरगावमधील सामाजिक व आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लोकांची काळजी घेण्याच्या उद्देशाने शिरगावमधील सामाजिक व आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख व्यक्तींनी एकत्रित येत निराधार फाऊंडेशनची स्थापना केली आहे. या फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी निसार शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी संदीप भोसले व कार्याध्यक्षपदी अभय कोलगे यांची निवड करण्यात आली आहे.
याबाबत ह. भ. प शिगवण यांच्या मठात बैठक पार पडली. यावेळी निराधार फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये सचिवपदी योगेश कदम, सहसचिवपदी स्वप्नील देसाई, तर खजिनदारपदी महेश शिगवण, प्रसिद्ध प्रमुखपदी प्रकाश देसाई, सोशल मीडिया अध्यक्षपदी रोहन नलावडे, सल्लागारपदी डॉ. यतीन मयेकर यांची निवड करण्यात आली. सदस्यपदी रवींद्र कोकाटे, समीर धांगडे, सुरेश रहाटे, प्रशांत सोलकर, समीर कुंभार्लीकर, साहिल शेख, रोहन नलावडे, प्रकाश देसाई, आनंद देसाई, धनंजय सोलकर, आदींची निवड करण्यात आली.