chiplun flood: कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या अवजलासाठी अभ्यास गटाची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 05:01 PM2022-05-21T17:01:28+5:302022-05-21T17:03:03+5:30

चिपळूण व महाड शहरातील पूर परिस्थिती संबंधात उपाययोजनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

Establishment of study group for release of water from Kolkewadi dam | chiplun flood: कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या अवजलासाठी अभ्यास गटाची स्थापना

chiplun flood: कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या अवजलासाठी अभ्यास गटाची स्थापना

googlenewsNext

चिपळूण : पावसाळा कालावधीत कोळकेवाडी धरणातून येणाऱ्या अवजलाच्या पाण्यामुळे चिपळूण शहरात पुराची दाहकता वाढते. यावर पावसाळा कालावधीत धरणातीलपाणी सोडण्याचे नियोजन करण्यासंदर्भातील उपाययोजना सूचविण्याकरीता अभ्यास गटाची स्थापन करण्यात आली आहे. या समितीत शासकीय अधिकाऱ्यांसह नऊ जणांचा समावेश आहे.

चिपळूण व महाड शहरातील पूर परिस्थिती संबंधात उपाययोजनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली १५ डिसेंबर रोजी बैठक पार पडली होती. सदर बैठकीमध्ये पावसाळा कालावधीत कोळकेवाडी धरणातून येणाऱ्या अवजलाच्या पाण्यामुळे चिपळूण शहरात पुराची दाहकता वाढते असे चिपळूण बचाव समिती सदस्य यांनी नमूद केले होते. याबाबत वस्तुस्थितीचा अभ्यास करुन उपाययोजना सूचविण्याकरीता निवृत्त मुख्य अभियंता डी. एन. मोडक यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची स्थापना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

या निर्देशानुसार अभ्यास गट स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार पावसाळा कालावधीत कोळकेवाडी धरणातून येणाऱ्या अवजलाच्या पाण्यामुळे पुराची दाहकता वाढते यावर पावसाळा कालावधीत कोळकेवाडी धरणातील पाणी सोडण्याचे नियोजन करण्यासंदर्भातील उपाययोजना सूचविण्याकरीता अभ्यास गट स्थापन करणेस शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

या समिती अध्यक्षपदी जलसंपदा विभागाचे सेवा निवृत्त मुख्य अभियंता दिपक मोडक, सदस्यपदी महाजेनको, पोफळीचे मुख्य अभियंता संजय चोपडे, रत्नागिरी पाटबंधारे मंडळाच्या अधीक्षक अभियंता वैशाली ग. नारकर, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, केएलई इन्स्टिट्यूट ऑफ तंत्रज्ञान, हुंबळीचे स्थापत्य अभियांत्रिकी  प्रमुख डॉ. शरद जोशी, चिपळूण रहीवाशी व सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश पाटणकर, ॲग्रो टुरिझम, चिपळूणचे संजीव अणेराव, सदस्य सचिवपदी कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितिश पोतदार व पाटबंधारे विभाग, रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता ज.म.पाटील यांची नियुक्ती झाली आहे.

या समितीमार्फत जुलै २०२१ च्या महापूरामध्ये कोयना अवजल विसर्गामुळे चिपळूण शहर व परिसरावर झालेला परिणाम तसेच त्या कालावधीत कोळकेवाडी धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गाच्या परिमाणाचे दृढीकरण व विसर्ग सोडण्याची कारणमिमांसा करणे, कोळकेवाडी अवजलाचा महत्तम विसर्ग, महत्तम भरती पातळीचे वेळी चिपळूण शहर परिसरात होणारा परिणाम, कोळकेवाडी ते वाशिष्ठी नदीच्या वहनक्षमतेबाबत अभ्यास करून त्यावेळी प्रकल्प अहवालामध्ये अवजल सोडणेची तरतूद केली आहे.

Web Title: Establishment of study group for release of water from Kolkewadi dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.