Ratnagiri: राजापूरसाठी स्थलांतर हाच पर्याय?, गेल्या दोन महिन्यांत शहराला पाच वेळा पुराच्या पाण्याचा वेढा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 03:27 PM2024-07-29T15:27:05+5:302024-07-29T15:27:24+5:30

विनाेद पवार राजा पूर : पावसाळा सुरू झाला की, राजापुरात पूर येताेच हे आता नित्याचे झाले आहे. पुराचे पाणी ...

Evacuation is the only option for Rajapur, the city has been surrounded by flood water five times in the last two months | Ratnagiri: राजापूरसाठी स्थलांतर हाच पर्याय?, गेल्या दोन महिन्यांत शहराला पाच वेळा पुराच्या पाण्याचा वेढा

Ratnagiri: राजापूरसाठी स्थलांतर हाच पर्याय?, गेल्या दोन महिन्यांत शहराला पाच वेळा पुराच्या पाण्याचा वेढा

विनाेद पवार

राजापूर : पावसाळा सुरू झाला की, राजापुरातपूर येताेच हे आता नित्याचे झाले आहे. पुराचे पाणी शहरात शिरून दरवर्षी किमान सात ते आठ वेळा बाजारपेठ ठप्प होते. मात्र, या वर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून किमान पाच वेळा पुराच्या पाण्याने राजापूर शहर बाजारपेठेत शिरकाव केला आहे. गाळ उपसा केल्यानंतरही राजापूरची पूर समस्या कायम आहे. त्यातच शासनाच्या पाटबंधारे विभागाने दोन वर्षांपूर्वी शहराच्या पूररेषेत वाढ केल्याने आता या पूररेषामुक्तीतून व पूरमुक्तीतून सुटका होण्यासाठी संपूर्ण राजापूर शहराचे स्थलांतर हा एकमेव पर्याय ठरणार आहे.

साधारणत: १८७९ साली राजापूर बंदर गाळाने भरल्यानंतर राजापूर बंदरात येणारी जहाजे येणे बंद झाले व राजापूरच्या वैभवाला उतरती कळा लागली. तेव्हापासून राजापूर आणि पूर हे समीकरण बनत गेले आहे ते आजतागायत तसेच आहे. मात्र, १९८३ साली आलेल्या महापुराने राजापूर शहर जलमय झाले व शासनाने राजापूर शहरात पूररेषा अस्तित्वात आणली. शासनाने लागू केलेली पूररेषा राजापूर नगर परिषदेने १९९३ साली स्वीकारल्यानंतर शहरातील पूरग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन शहराजवळील कोदवली ग्रामपंचायत हद्दीत करण्यात आले. मात्र, हे पुनर्वसन पूर्णत: अयशस्वी ठरले आहे.

गतवर्षी राजापूर शहरातून वाहणाऱ्या कोदवलीसह अर्जुना नदीपात्रातील गाळ उपसा झाल्यानंतर पुराची तीव्रता कमी होईल, असे वाटत हाेते. गेल्या दोन महिन्यांच्या काळात राजापूर शहरात आजपर्यंत पाच वेळा पुराचे पाणी शिरून शहरवासीयांना नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. अद्यापही अजून अर्धा पावसाळा बाकी आहे. या वर्षी सर्वाधिक पूर हा जुलै महिन्यात आला असून, या महिन्यात चार वेळा पुराने राजापूर शहराला वेढा दिला आहे.

पावसाचा जोर वाढला की काेदवली व अर्जुना नद्यांच्या पाणी पातळीत वाढ हाेते आणि पुराचे पाणी शहरात शिरते. शहरात पाणी शिरले की शहरवासीयांना व्यापाराबरोबर अन्य वैयक्तिक नुकसानाला सामोरे जावे लागते. शहरातील संपूर्ण वाहतूक व्यवस्था व जनजीवन पुरामुळे विस्कळीत होते. त्यामुळे या पूरसमस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी गेल्या अनेक दशकांपासून करण्यात येत आहे. मात्र, या मागणीची पूर्तता न केल्याने अजूनही राजापूरकरांच्या डाेक्यावर पुराची टांगती तलवार कायम आहे. पुराच्या धाेक्यातून राजापूरकरांची सुटका कधी हाेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वाढता धाेका

पावसाचा जाेर वाढताच अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ हाेते. जुलै महिन्यात पाच वेळा नदीचे पाणी शहरात शिरले हाेते. शनिवारी (२७ राेजी) अर्जुना नदीची पाणी पातळी ५.४० मीटरपर्यंत पाेहाेचली हाेती. इशारा पातळीच्या वर पाणी पातळी पाेहाेचल्याने शहरातील जवाहर चाैकात पाणी आले हाेते.

Web Title: Evacuation is the only option for Rajapur, the city has been surrounded by flood water five times in the last two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.