नानांचे स्वप्न साकारण्यासाठी सर्वांचे योगदान हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:34 AM2021-09-21T04:34:27+5:302021-09-21T04:34:27+5:30
आबलोली : गुहागर तालुक्यातील काजुर्लीसारख्या ग्रामीण, दुर्गम भागात विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून माध्यमिक विद्यालय उभारण्याचे स्वप्न नाना मयेकर ...
आबलोली : गुहागर तालुक्यातील काजुर्लीसारख्या ग्रामीण, दुर्गम भागात विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून माध्यमिक विद्यालय उभारण्याचे स्वप्न नाना मयेकर यांनी पाहिले होते. दुर्दैवाने गतवर्षी त्यांचे अकाली निधन झाले. नानांचे शैक्षणिक कार्य आपणा सर्वांच्या सोबतीने काजुर्ली विद्यालयाच्या रूपाने अविरतपणे सुरू ठेवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुनील मुरारी मयेकर यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करावयाच्या शैक्षणिक उपाय योजनांची पूर्तता करण्यासाठी मालगुंड एज्युकेशन सोसायटी, नाना मयेकर यांचा परिवार आणि काजुर्लीतील कैलास साळवी, चंद्रकांत खानविलकर, सुधाकर गोणबरे, दीपक साळवी, सीमा लिंगायत, अनंत मोहिते, शाळेसाठी जागा देणारे अशोक मोहिते, आदी स्थानिक ग्रामस्थ या सर्व घटकांचे योगदान लाभले आहे. माध्यमिक विद्यालय काजुर्लीच्या नूतन इमारत प्रवेश समारंभ व नाना मयेकर माध्यमिक विद्यालय काजुर्ली नामकरण कार्यक्रमात ते बोलत होते.
सुनील मयेकर यांच्या हस्ते विद्यालयाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले, तर रोहित मयेकर यांच्या हस्ते गणेशपूजन करण्यात आले. दीप्ती मयेकर, मोहन मयेकर यांच्या हस्ते नूतन इमारतीच्या चाव्या मुख्याध्यापक अमोल पवार यांच्याकडे प्रदान करण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अमोल पवार यांनी केले. संस्थेचे सचिव विनायक राऊत, संचालक गजानन पाटील, किशोर पाटील, रोहित मयेकर, प्रा. उमेश अपराध, काजुर्लीचे उपसरपंच सुधाकर गोणबरे यांनी डॉ. नानांच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी संस्थेचे सचिव विनायक राऊत, खजिनदार संदीप कदम, संचालक किशोर पाटील, गजानन पाटील, सल्लागार उमेश अपराध, विलास राणे, नंदकुमार साळवी, श्रीकांत मेहेंदळे, ट्रस्टी सुधीर देसाई, मोहन मयेकर, रोहित मयेकर, ऋषीकेश मयेकर, काजुर्लीच्या सरपंच रुक्मिणी सुवरे, उपसरपंच सुधाकर गोणबरे, पोलीस पाटील सीमा लिंगायत, तंटामुक्त समिती अध्यक्ष भालचंद्र जोशी, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार धांगडे, मेघना मोहिते, रामचंद्र गोणबरे, बाळकृष्ण राणे, चंद्रकांत गोणबरे, जिल्हा परिषद शाळा काजुर्ली नं. १ चे मुख्याध्यापक वासुदेव पांचाळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाकादेवी विद्यालयाचे शिक्षक संतोष पवार यांनी केले.