आरोग्य सेवेअंतर्गत भरतीसाठी जिल्ह्यात आजपासून विविध केंद्रांवर परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:34 AM2021-09-25T04:34:49+5:302021-09-25T04:34:49+5:30

रत्नागिरी : आयुक्तालय आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई यांच्यामार्फत दि. २५ ...

Examination for recruitment under health service at various centers in the district from today | आरोग्य सेवेअंतर्गत भरतीसाठी जिल्ह्यात आजपासून विविध केंद्रांवर परीक्षा

आरोग्य सेवेअंतर्गत भरतीसाठी जिल्ह्यात आजपासून विविध केंद्रांवर परीक्षा

Next

रत्नागिरी : आयुक्तालय आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई यांच्यामार्फत दि. २५ व २६ सप्टेंबर रोजी गट क व गट ड संवर्ग भरतीसाठी परीक्षा आयोजित केली आहे. जिल्ह्यातील विविध केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.

गट-क सरळसेवा पदभरती परीक्षा २५ सप्टेंबर रोजी होणार आहे. यासाठी जिल्ह्यात १७ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत, ती अशी : रत्नागिरी तालुक्यात मराठा मंदिर न्यू इंग्लिश स्कूल, पाली. श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यामंदिर खेडशी. लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालय, फणसोप. बळीराम पारकर विद्यामंदिर मालगुंड, स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर पावस, माध्यमिक विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज, नाणीज, माध्यमिक विद्यामंदिर जयगड, गर्व्हन्मेंट पॉलिटेक्निक रत्नागिरी, मराठा मंदिर, अ. के. देसाई हायस्कूल, रत्नागिरी, फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी, गर्व्हन्मेंट कॉलेज ऑफ फार्मसी रत्नागिरी, जिंदाल विद्यामंदिर चाफेरी, रत्नागिरी, तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय रत्नागिरी. राजेंद्र माने पॉलिटेक्निक, आंबव, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, साडवली (ता. संगमेश्वर), घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लवेल खेड, व्हीपीएमएस महर्षि परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, गुहागर.

गट-ड सरळसेवा पदभरती परीक्षा २६ सप्टेंबर रोजी विविध केंद्रांवर होणार असून निश्चित केलेली केंद्रे अशी : रत्नागिरी तालुका - मराठा मंदिर न्यू इंग्लिश स्कूल, पाली, श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यामंदिर खेडशी, लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालय, फणसोप, बळीराम पारकर विद्यामंदिर मालगुंड, स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर पावस, माध्यमिक विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज, नाणीज, माध्यमिक विद्यामंदिर जयगड, गर्व्हन्मेंट पॉलिटेक्निक रत्नागिरी, मराठा मंदिर, अ. के. देसाई हायस्कूल, रत्नागिरी, फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी, जिंदाल विद्यामंदिर चाफेरी, रत्नागिरी, तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय रत्नागिरी, घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लवेल, ता. खेड, व्हीपीएमएस महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, गुहागर, राजेंद्र माने पॉलिटेक्निक, आंबव, ता. संगमेश्वर.

अपर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ प्रमाणे या सर्व परीक्षा केंद्रावर १०० मीटर परिसरात परीक्षेच्या दिवशी सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

Web Title: Examination for recruitment under health service at various centers in the district from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.