exam: महाराष्ट्रात परीक्षा ऑफलाईनच, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंतांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 06:51 PM2022-04-26T18:51:45+5:302022-04-26T19:03:18+5:30

कुलगुरूंच्या बैठकीमध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात बहुसंख्य कुलगुरु ठाम आहेत. परीक्षा घेताना विध्यार्थ्यांना प्रश्न संच विद्यापीठ देणार आहे, दोन पेपर मध्ये २ दिवसाचे अंतर असणार आहे,परीक्षा मे मध्ये न घेता १ जून ते १५ जुलै पर्यंत होतील असे कुलगुरूंनी निश्चित केले आहे.

exams are offline only In Maharashtra says Minister Uday Samant | exam: महाराष्ट्रात परीक्षा ऑफलाईनच, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंतांनी दिली माहिती

exam: महाराष्ट्रात परीक्षा ऑफलाईनच, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंतांनी दिली माहिती

Next

रत्नागिरी : राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यावर ठाम आहेत. १ ते १५ जुलैदरम्यान विद्यापीठांकडूनपरीक्षा घेतल्या जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आता ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याची तयारी विद्यापीठांकडून करण्यात येत आहे. मात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन परीक्षेची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेतली.

कुलगुरूंच्या बैठकी मध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात बहुसंख्य विद्यापीठ कुलगुरु ठाम आहेत. परीक्षा घेताना विध्यार्थ्यांना प्रश्न संच विद्यापीठ देणार आहे, दोन पेपर मध्ये २ दिवसाचे अंतर असणार आहे,परीक्षा मे मध्ये न घेता १ जून ते १५ जुलै पर्यंत होतील असे कुलगुरूंनी निश्चित केले आहे.

बैठकीनंतर सामंत यांनी ट्विटद्वारे माहिती दिली. “कुलगुरूंच्या बैठकीमध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात बहुसंख्य विद्यापीठ कुलगुरु ठाम आहेत. परीक्षा घेताना विद्यार्थ्यांना प्रश्न संच विद्यापीठ देणार आहे. दोन पेपरमध्ये दोन दिवसाचे अंतर असणार आहे, परीक्षा मे मध्ये न घेता १ जून ते १५ जुलै पर्यंत होतील असे कुलगुरूंनी निश्चित केले आहे.”, असे उदय सामंत यांनी नमूद केले आहे.

Web Title: exams are offline only In Maharashtra says Minister Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.