नांदिवडे आणि सांडेलावगण ग्रामपंचायतींचे लसीकरणासाठी उत्तम नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:23 AM2021-06-04T04:23:53+5:302021-06-04T04:23:53+5:30
रत्नागिरी : तालुक्यातील नांदिवडे उपकेंद्रातील गावांना लस देण्यात आली. या उपकेंद्रातील कासारी सांडेलावगण ग्रामपंचायतीला ७० डोस देण्यात आले. ...
रत्नागिरी : तालुक्यातील नांदिवडे उपकेंद्रातील गावांना लस देण्यात आली. या उपकेंद्रातील कासारी सांडेलावगण ग्रामपंचायतीला ७० डोस देण्यात आले. लसीकरणाबाबत या गावामध्ये ग्रामपंचायत सदस्यांनी उत्तम प्रकारे जनजागृती केली. या उपकेंद्रात काही दिवस आधी कासारी सांडेलावगण ग्रामपंचायतीला लस देण्याचा दिवस कळविण्यात आलेला होता. कोरोना लसीबाबत ग्रामस्थांच्या मनात अनेक समज-गैरसमज निर्माण झालेले होते. लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांचे हे गैरसमज मिटवून त्यांना लसीचे महत्त्व पटवून दिले. आणि यातूनच ७० डोस या सर्वांना देण्यात आले. यासंदर्भात वेळोवेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटदच्या आरोग्य अधिकारी डॉ. श्रुती कदम यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले. आरोग्य सहाय्यिका अश्विनी शिरधनकर, आरोग्य सेविका सुषमा किल्लेकर, चालक विनायक दुधवाडकर, आशा सेविका संगीता बंडबे, ऑनलाइन नोंदणीसाठी परिसरातील शिक्षक, शिक्षिका यांचेही योगदान उत्तम लाभले.
लसीकरणाचे नियोजन नांदीवडे ग्रामपंचायतीने उत्तम पद्धतीने केले. ग्रामस्थांची उत्तम व्यवस्था, तसेच लसीकरणास आलेल्या सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांची सर्व व्यवस्था नांदिवडेच्या सरपंच आर्या गडदे, उपसरपंच विवेक सुर्वे आणि त्यांच्या सर्व कर्मचारी वर्गाने उत्तम केले. नांदिवडे ग्रामपंचायत तसेच ग्रुप ग्रामपंचायत कासारी-सांडेलावगणच्या सरपंच दर्शना बेनेरे यांनीही ग्रामस्थांची व्यवस्था केलेली होती. यावेळी कासारी-सांडेलावगण ग्रामपंचायतीचे उपसरपंच संदेश महाकाळ, सदस्य विद्या खैर, प्रसाद पाष्टे हेही उपस्थित होते. या यंत्रणेत सर्व सहभागी कर्मचारी वर्गाचे सरपंच दर्शना बेनेरे यांनी आभार मानले.