दापोलीत मृत कावळे आढळल्याने खळबळ, मृत्यु बर्डफ्लुमुळे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 14:23 IST2021-01-11T14:18:51+5:302021-01-11T14:23:19+5:30
Bird Flu Ratnagiri- दापोलीत काही दिवसांपूर्वीच डम्पिंग ग्राउंड परिसरात पाच कावळे मृतावस्थेत आणि त्याच दिवशी संध्याकाळी सबा कॉम्पेल्क्स काळकाई कोंड दापोली येथे सापडलेल्या मृत कावळ्यानंतर आता रविवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास शहरातील बुरोंडी नाका परिसरातील कोहिनूर हॉटेलसमोर अशाच प्रकारे दोन कावळे मृतावस्थेत आढळले आहेत. त्यामुळे दापोलीत खळबळ उडाली आहे.

दापोलीत मृत कावळे आढळल्याने खळबळ, मृत्यु बर्डफ्लुमुळे?
दापोली: दापोलीत काही दिवसांपूर्वीच डम्पिंग ग्राउंड परिसरात पाच कावळे मृतावस्थेत आणि त्याच दिवशी संध्याकाळी सबा कॉम्पेल्क्स काळकाई कोंड दापोली येथे सापडलेल्या मृत कावळ्यानंतर आता रविवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास शहरातील बुरोंडी नाका परिसरातील कोहिनूर हॉटेलसमोर अशाच प्रकारे दोन कावळे मृतावस्थेत आढळले आहेत. त्यामुळे दापोलीत खळबळ उडाली आहे.
मागील आठवड्यात गुरुवारी अशाच प्रकारे सापडलेले ते मृत कावळे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक तपासणी करून मृत पक्षी शवविच्छेदनासाठी पुणे इथे पाठवले आहेत, मात्र त्यांचा अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच शहरात अचानक आणखी दोन कावळे मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे.
याही कावळ्यांची प्राथमिक तपासणी झाल्यानंतरच त्यांच्या आकस्मिक मृत्यूचे नेमके कारण कळणार आहे. तोपर्यंत अशा मृतावस्थेतील पक्षांना कोणीही हात न लावणे व संबंधित प्रशासनाला कळवणे आवश्यक आहे. दापोलीकरांनी सावधान रहाणे आवश्यक आहे.