शाखा अभियंत्यांच्या निलंबनाने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:21 AM2021-07-11T04:21:59+5:302021-07-11T04:21:59+5:30
रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी कामचुकारपणा, हलगर्जीपणा तसेच ...
रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी कामचुकारपणा, हलगर्जीपणा तसेच उध्दट वागणुकीबाबत कडक पावले उचलली आहेत. त्यामुळे दापोली आणि संगमेश्वर पंचायत समितीच्या शाखा अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई करून दणका दिला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
रत्नागिरी : शहर परिसरामध्ये खड्ड्यांचे प्रमाण जास्त असल्याने लोकांचे हाल सुरू आहेत. वाहनधारकांच्या पाठीचे दुखण्याने त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नगर परिषदेला नगर परिषदेने हे रस्ते दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करीत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढतोय
रत्नागिरी : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी कधी होणार, या चिंतेने लोकांना ग्रासले आहेत. तालुक्यात सर्वात जास्त कोरोना रुग्ण असून रुग्णांचे मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे वाढत्या संसर्गाची कारणे शोधण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाचे रुग्ण कमी होतील, ही अपेक्षा फाेल ठरली आहे.
आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार
चिपळूण : कोरोनाबाधित रुग्णांसाठी आधार ठरणाऱ्या कामथे उपजिल्हा रुग्णालयात सध्या कोविड जैववैद्यकीय कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, असा प्रश्न रुग्णालय व्यवस्थापनासमोर उभा राहिला आहे. ही समस्या न सोडविल्यास आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
गावागावात मार्गदर्शन शिबिर
दापोली : आमदार योगेश कदम यांच्या हस्ते दापोली तालुक्यातील देवांगमधील शेतकऱ्यांना हळद रोपांचे वाटप करण्यात आले. आमदार कदम यांनी कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांना हळद लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये आवड निर्माण करण्याचे उद्देशाने गावागावात मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
पेढांब पुलावर खड्ड्यात
चिपळूण : तालुक्यातील पेढांबे येथील पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खोल खड्ड्यांत वाहने अडकल्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, राष्ट्रीय महामार्ग उपविभागाकडून खड्डे बुजवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.