लोटे एमआयडीसीतील घरडा कंपनीत स्फोट, तीन कर्मचाऱ्यांच्या होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 11:29 AM2021-03-20T11:29:01+5:302021-03-20T11:58:29+5:30
Lote MIDC fire in Ratnagiri: शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. घरडा कंपनीच्या प्लँट नं. ७ बी येथे मटेरियल चार्जिंग करणाऱ्या रिॲक्टरमध्ये स्फोट झाला, असा प्राथमिक अंदाज आहे.
आवाशी (खेड) : रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा कंपनीत स्फोट होऊ लागलेल्या आगीत तीन कर्मचारी जळून ठार झाले तर तिघेजण अतिगंभीर जखमी झाले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना ऐरोली येथे हलवण्याचा विचार सुरू आहे. (Explosion at Gharda company of Ratnagiri, three death.)
शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. घरडा कंपनीच्या प्लँट नं. ७ बी येथे मटेरियल चार्जिंग करणाऱ्या रिॲक्टरमध्ये स्फोट झाला, असा प्राथमिक अंदाज आहे. या स्फोटामुळे आग लागली आणि तेथे काम करणाऱ्यां कर्मचाऱ्यांपैकी तिघेजण जळून जागीच ठार झाले. त्यांचे चेहरे पूर्ण भाजले असल्याने त्यांची ओळख पटली नव्हती. अन्य तिघेजण अतिगंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी ऐरोली येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Maharashtra: 4 people died and 1 critically injured in an explosion at a chemical factory in an industrial area in Ratnagiri district. More details awaited.
— ANI (@ANI) March 20, 2021
आग आटोक्यात आणण्याचे काम लगेचच हाती घेण्यात आले. मात्र तोपर्यंत बरेच नुकसान झाले आहे.