आरटीईंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:21 AM2021-07-08T04:21:59+5:302021-07-08T04:21:59+5:30

रत्नागिरी : आरटीईंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील मुलांना इयत्ता पहिलीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे प्रवेश प्रक्रिया रेंगाळत ...

Extension for admission process under RTE | आरटीईंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ

आरटीईंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ

Next

रत्नागिरी : आरटीईंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील मुलांना इयत्ता पहिलीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे प्रवेश प्रक्रिया रेंगाळत असल्याने प्रवेशासाठी पालकांना दि. ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार (आरटीई) अंतर्गत पहिलीसाठी मोफत प्रवेश मिळण्यासाठी जिल्ह्यातून ९३५ अर्ज ऑनलाईन प्रणालीने दाखल करण्यात आले होते. त्यात ऑनलाईन लॉटरी प्रणालीने ६०९ विद्यार्थ्यांची निवड प्रवेशाकरिता करण्यात आली होती. लॉटरी प्रणालीने प्रवेशाकरिता पात्र ठरलेल्या पालकांना निवड झालेल्या शाळेत प्रत्यक्षात प्रवेश देण्यासाठी दि. ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती.

मात्र, दि.३० जूनपर्यंत कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. उर्वरित विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी करून शालेय स्तरावर प्रत्यक्षात ऑनलाईन प्रणालीने प्रवेश निश्चित करण्यासाठी तांत्रिक समस्या निर्माण होत आहेत. तांत्रिक समस्येमुळे प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना प्रवेश प्रक्रियेसाठी प्राप्त होणाऱ्या ओटीपीत तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत.

निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात समस्या निर्माण होत असल्याने शिक्षण संचालकांकडूनच प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढीचे लेखी आदेश शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत. त्यामुळे पालकांना दिलासा प्राप्त झाला आहे. निवड यादीतील परंतु प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश यामुळे सोपा झाला आहे.

Web Title: Extension for admission process under RTE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.