गुहागरात शिधापत्रिका तपासणी मोहिमेला मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:31 AM2021-03-17T04:31:56+5:302021-03-17T04:31:56+5:30

असगोली : शिधापत्रिका तपासणीसाठीचा मर्यादित कालावधी व जाचक अटींमध्ये सुधारणा करून तपासणी माेहिमेला मुदतवाढ देण्याची मागणी गुहागर भाजपतर्फे करण्यात ...

Extension of ration card inspection campaign in Guhagar | गुहागरात शिधापत्रिका तपासणी मोहिमेला मुदतवाढ

गुहागरात शिधापत्रिका तपासणी मोहिमेला मुदतवाढ

Next

असगोली : शिधापत्रिका तपासणीसाठीचा मर्यादित कालावधी व जाचक अटींमध्ये सुधारणा करून तपासणी माेहिमेला मुदतवाढ देण्याची मागणी गुहागर भाजपतर्फे करण्यात आली हाेती. या मागणीची दखल घेऊन तपासणी मोहिमेची मुदत १२ एप्रिल २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक व कार्यकर्त्यांनी याबाबतचे निवेदन तहसीलदार यांना दिले हाेते.

या रेशनकार्ड तपासणीवेळी आपले उत्पन्न दाखविणे बंधनकारक आहे. याकरिता गुहागर तहसील विभागाकडून उत्पन्नाचा दाखला अनिवार्य करण्यात आला होता. ही अट आता शिथिल करण्यात आली आहे. रेशनकार्ड धारकाने भरलेल्या अर्जात उत्पन्नाची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना संशयास्पद आढळली, तरच उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागणार आहे. तसेच निवासाबाबत दिलेल्या १० आवश्यक पुराव्यांपैकी एक पुरावा सादर केला तरी तो ग्राह्य ठरणार आहे. अवघ्या १५ दिवसात संपणारे आर्थिक वर्ष, कोरोना संक्रमणाचा पुन्हा सुरू झालेला प्रादुर्भाव, कामकाजाच्या व सणासुदीच्या दिवसात वेळेचा अपव्यय, तसेच उत्पन्नाच्या दाखल्यासाठी पडणारा आर्थिक भुर्दंड या सर्व गोष्टींना गुहागर तालुक्यातील ७२ रेशन दुकानातील ३६००० रेशनकार्ड धारकांना सामोरे जावे लागणार होते. मात्र, माेहिमेला मुदतवाढ दिल्याने गुहागरवासीयांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Extension of ration card inspection campaign in Guhagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.