शिष्यवृत्तीसाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:21 AM2021-06-19T04:21:57+5:302021-06-19T04:21:57+5:30

वैद्यकीय मदत चिपळूण : हितवर्धक गुरव समाज, मुंबईतर्फे मुंबई व ग्रामीण भागातील भाविक गुरव समाजबांधवांच्या सेवेसाठी कार्यरत आहे. कला, ...

Extension for Scholarship | शिष्यवृत्तीसाठी मुदतवाढ

शिष्यवृत्तीसाठी मुदतवाढ

Next

वैद्यकीय मदत

चिपळूण : हितवर्धक गुरव समाज, मुंबईतर्फे मुंबई व ग्रामीण भागातील भाविक गुरव समाजबांधवांच्या सेवेसाठी कार्यरत आहे. कला, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेने कोरोना महामारीच्या परिस्थितीत समाजबांधवांसाठी वैद्यकीय आर्थिक मदत तसेच गरजू समाजबांधवांना धान्यवाटप केले.

मास्क वाटप

रत्नागिरी : कोरोना रुग्णांसाठी रुग्णालयात जाऊन त्याची देखभाल करणाऱ्या झकी खान व त्यांच्या पथकाला रत्नागिरी राष्ट्रवादी युवक काॅंंग्रेस व जी. एम. व्ही. फार्माकडून मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. खान यांच्यासमवेत सिद्धेश धुळप, नीलेश निवळकर कार्यरत आहेत.

बियाण्यांचे वाटप

रत्नागिरी : फिनोलेक्स कंपनी तसेच मुकुल महादेव फाउंडेशनतर्फे कसोप, फणसोप गावांत शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी कंपनीचे अधिकारी काकडे, मंगेश साळवी, मनोज साळवी, नंदा मुरकर, प्रकाश साळवी, समीर साळवी, अभिषेक साळवी, आदी उपस्थित होते.

झाडांचा लिलाव

मंडणगड : निसर्ग चक्रीवादळाने मंडणगड तालुक्यातील माैजे वेळास या गावातील समुद्रकिनारी असणारी एकूण १९६३ सुरूची झाडे वादळामुळे उन्मळून पडली होती. त्याचे मूल्यांकन एक लाख दोन हजार २२३ रुपये करण्यात आले. मात्र एक लाख सात हजार ५०१ रुपयांमध्ये लिलाव घेण्यात आला.

संजय मालणकर प्रथम

रत्नागिरी : श्री माउली प्रासादिक रत्नागिरी जिल्हा भजन मंडळातर्फे प्रथमच घेतलेल्या ऑनलाईन कोकण विभागीय गजर स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री भिवतादेवी प्रासादिक भजन मंडळ, नांदोसचे बुवा संजय मालणकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. यात कोकणातील २७ मंडळे सहभागी झाली होती.

हळदीच्या रोपांचे वाटप

दापोली : तालुक्यातील देगाव येथे परिसरातील शेतकऱ्यांना प्रो-ट्रेमधील तयार हळदींच्या रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार योगेश कदम, डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. संजय सावंत, उपविभागीय कृषी अधिकारी दीपक कुटे उपस्थित होते.

ऑनलाईन परिसंवाद

दापोली : येथील (कै.) कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठानतर्फे ‘कोकणचा शाश्वत विकास’ या विषयावर आज, शनिवोरी रोजी दुपारी चार व सहा या वेळेत ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध तज्ज्ञ या परिसंवादामध्ये सहभागी होणार आहेत.

बससेवेला प्रारंभ

मंडणगड : तालुक्यातील तिडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या मागणीवरून मंडणगड-तिडे-नालासोपारा बससेवा सुरू करण्यात आली आहे. मंडणगड येथून नालासोपारासह मंडणगड-बोरिवली, मंडणगड-पुणे गाड्या सुरू करण्यात आल्या असून परतीसाठीही धावणार आहेत.

रानभाज्या विक्रीला

रत्नागिरी : बाजारात रानभाज्या विक्रीला येऊ लागल्या आहेत. फोडशी, टाकळा, भारंगीची भाजीविक्रीसाठी येत आहे. काही मोजक्याच विक्रेत्या भाज्या विक्रीसाठी आणत असून हातोहात भाज्या संपत आहेत. २० रुपये दराने भाज्यांच्या जुडीची विक्री सुरू आहे.

Web Title: Extension for Scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.