गाड्यांना मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:21 AM2021-06-20T04:21:35+5:302021-06-20T04:21:35+5:30

खेड : कोकण मार्गावर धावणाऱ्या चार सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार एर्नाकुलम -ओखा, तिरूनेलवेली-दादर, ...

Extension of trains | गाड्यांना मुदतवाढ

गाड्यांना मुदतवाढ

Next

खेड : कोकण मार्गावर धावणाऱ्या चार सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार एर्नाकुलम -ओखा, तिरूनेलवेली-दादर, पटणा -वास्को द गामा साप्ताहिक स्पेशल गाड्यांसह मंगळूर-लोकमान्य टिळक नियमित सुपरफास्ट स्पेशल गाडी नोव्हेंबरपर्यंत धावणार आहेत.

तालुकाध्यक्षपदी निवड

रत्नागिरी : काँग्रेसच्या रत्नागिरी महिला शहर अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या रिझवाना शेख यांची महिला तालुकाध्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या तालुकाध्यक्ष निवडीबद्दल स्वागत होत आहे.

धरण भरले

संगमेश्वर : तालुक्यातील गडनदी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या धरणात एकूण ६४.८८ दलघमी पाणीसाठा असून त्यातील उपयुक्त पाणीसाठा ६४.५६ दलघमी एवढा आहे. गड नदी धरण पहायला जाणाऱ्यांनी धरणात उतरू नये, असे आवाहन उपविभागीय अभियंता संजय सोनवणे यांनी केले.

मुसळधार पाऊस

रत्नागिरी : रत्नागिरीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे माेठ्या प्रमाणावर घरांचे नुकसान होत आहे. आणखी काही दिवस पावसाचा जोर असाच राहणार आहे.

भाडेवाढ होणार

चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलने दराने शंभरी ओलांडली आहे. डिझेलही त्याच उंबरठ्यावर आहे. इंधन पावरचा खर्च वाढल्याने वाहतूकदारांनी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूकदारांनी पाच टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Extension of trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.