गणेशोत्सवासाठी गुहागर आगारातून जादा बसफेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:35 AM2021-08-28T04:35:20+5:302021-08-28T04:35:20+5:30

असगोली : गणेशोत्सवात गुहागरात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी गुहागर आगारातर्फे ऑगस्ट महिन्यापासून जादा बसफेऱ्या व ग्रुप ...

Extra bus service from Guhagar depot for Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी गुहागर आगारातून जादा बसफेऱ्या

गणेशोत्सवासाठी गुहागर आगारातून जादा बसफेऱ्या

Next

असगोली : गणेशोत्सवात गुहागरात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी गुहागर आगारातर्फे ऑगस्ट महिन्यापासून जादा बसफेऱ्या व ग्रुप बुकिंगची सुरुवात केली आहे. आगारातून २०१९ मध्ये २४८, तर २०२० मध्ये २२० पर्यंत मुंबइ, पुणे येथे बसफेऱ्या साेडण्यात आल्या हाेत्या.

यावर्षीही आगारातून गणेशाेत्सवासाठी बसफेऱ्या साेडण्यात येणार आहेत. आगारातून १७ ऑगस्ट राेजी २ विठ्ठलवाडी, २ विरार अशा फेऱ्या सुरू केल्या आहेत, तर आरक्षणासाठी १४ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या कालावधीत १ मुंबई, २ बोरिवली, २ भांडुप अशा फेऱ्या साेडण्यात येणार आहेत. तसेच १६ सप्टेंबरसाठी १० गाड्यांचे, तर नालासोपारा येथून गुहागर आतील आणखी दहा गाड्यांचे ग्रुप बुकिंग झाले आहे. एकूण ४८ गाड्या आतापर्यंत लावण्यात आल्या आहेत. गुहागरातून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण मुंबईतूनही केले जात असल्याचे आगर प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: Extra bus service from Guhagar depot for Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.