फेसबुकद्वारे तरुणीची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 05:39 PM2017-07-22T17:39:24+5:302017-07-22T17:39:24+5:30

रत्नागिरी पोलीस स्थानकात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Facebook victimization fraud | फेसबुकद्वारे तरुणीची फसवणूक

फेसबुकद्वारे तरुणीची फसवणूक

Next

रत्नागिरी : फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करून तरुणीला ५४ हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना शिवरेवाडी येथे घडली. याप्रकरणी पोलीस स्थानकात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


साक्षी उमेश खेराडे (२०, शिवरेवाडी, रत्नागिरी) हिची फेसबुकवर एका व्यक्तीसोबत ओळख झाली होती. १४ जुलै रोजी साक्षी हिला त्या व्यक्तीने माझ्या बहिणीचे लग्न असून, तिला साडी व दागिन्यांची गरज आहे. त्यावेळी साक्षी हिने क्षणाचाही विलंब न करता मैत्रीखातर त्याला तीन तोळ्याचे दागिने व एक साडी दिली. मात्र, हे दागिने परत न मिळाल्याने साक्षी हिने फसवणुकीची तक्रार दिली आहे.


हर्णैचे सरपंच, उपसरपंच जखमी


दापोली : हर्णे सरपंच मुनिरा शिरगावकर, उपसरपंच दीपक खेडेकर हे अपघातात जखमी झाले आहेत. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी मंत्रालयात बोलावलेल्या बैठकीला जात असताना हा अपघात झाला असून, या अपघातात अन्य ५ जण किरकोळ जखमी आहेत. खेम धरण गळती प्रकरणाची बैठक गुरुवारी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी मुंबई येथे बोलावली होती. या बैठकीनिमित्त सरपंच, उपसरपंचांचे शिष्टमंडळ मुंबईकडे जाण्यासाठी निघाले होते. मात्र, रस्त्यात गाडीला अपघात झाल्याने ते बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.


रावळगाव येथे घरावर झाड पडल्याने नुकसान


चिपळूण : रावळगाव - तांबडवाडी येथील एका घरावर वादळी पावसामुळे झाड कोसळून घराचे मोठे नुकसान झाले. ही घटना बुधवारी रात्री घडली. तांबडवाडी येथील रविकांत महादेव जाधव, नवनाथ महादेव जाधव, अनंत जाधव यांच्या सामाईक घरावर हे झाड कोसळले. त्यामुळे घराचे मोठे नुकसान झाले. याबाबत माहिती मिळताच गटविकास अधिकारी अरुण जाधव, सरपंच सुरेश जाधव, पंचायत समिती सदस्य अनुजा चव्हाण यांनी पाहणी केली.


सेवा बजावतानाच शिक्षकाचा मृत्यू


साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा केंद्राचे केंद्रप्रमुख सत्याप्पा सुबराव रुपनूर यांचे शैक्षणिक सेवा बजावताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.केंद्रप्रमुख सत्याप्पा रुपनूर हे कोंडगाव - वाणीवाडी येथील शाळा तपासून जिल्हा परिषद शाळा, तिवरे तर्फे देवळे येथे शाळा तपासणीसाठी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास पोहोचले. शाळेत येताच शाळेतील शिक्षकांनी त्यांना बसण्यास खुर्ची दिली आणि काही कळायच्या आतच त्यांच्यावर काळाने झडप घातली. शिक्षकांनी व सहकाऱ्यांनी त्वरित त्यांना साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.वैद्यकीय अधिकारी डॉ. आदाटे यांनी शवविच्छेदन करुन शव नातेवाईकांच्या ताब्यात दिले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Facebook victimization fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.