खेडमध्ये कोविड रुग्णांसाठी २०० बेडची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:30 AM2021-04-15T04:30:05+5:302021-04-15T04:30:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खेड : वाढत्या रुग्णसंख्येमुळे खेड तालुक्यात एक कोविड केअर सेंटर अपुरे पडू लागल्याने आता एक नवीन ...

Facility of 200 beds for Kovid patients in Khed | खेडमध्ये कोविड रुग्णांसाठी २०० बेडची सुविधा

खेडमध्ये कोविड रुग्णांसाठी २०० बेडची सुविधा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

खेड : वाढत्या रुग्णसंख्येमुळे खेड तालुक्यात एक कोविड केअर सेंटर अपुरे पडू लागल्याने आता एक नवीन सेंटर वाढवण्यात आले आहे. त्यामुळे खेडमध्ये आता २०० बेड्सची उपलब्धता झाली आहे. अर्थात सध्या २०५ ॲक्टिव्ह रुग्ण असल्याने आणि रुग्णवाढीचा वेग अधिक असल्याने ही क्षमताही काही दिवसांतच अपुरी ठरण्याची भीती आरोग्य यंत्रणेला आहे.

तालुक्यातील कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, लवेल येथील शासकीय कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले आहे. यावर्षी सुरुवातीला जानेवारी महिन्यात केवळ ३५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. फेब्रुवारीमध्ये रुग्णसंख्या १४५ होती तर मार्च महिन्यात १८९ झाली. एप्रिल महिन्यात पहिल्या दोन आठवड्यांत ॲक्टिव्ह रुग्णसंख्या २०५ झाली आहे. कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी सद्य:स्थितीत तालुक्यात २०० बेडची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये ऑक्सिजन सुविधा असलेले ६० बेड्स आहेत. दररोजच्या वाढत्या पॉझिटिव्ह रुग्णांमुळे आरोग्य विभागाने लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात पुन्हा कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या सेंटरची क्षमता १२० बेडची आहे. कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात ५० बेडची सुविधा उपलब्ध असून याठिकाणी रुग्णांसाठी ऑक्सिजन प्रणाली पुरविण्यात येते. ड्युरा ऑक्सिजन सिस्टिम गतवर्षी कार्यान्वित करण्यात आल्यामुळे ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांना या प्रणालीद्वारे ऑक्सिजन पुरविण्यात येतो.

खेड शहरातील नगर परिषदेच्या दवाखान्यात सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरची क्षमता २० बेडची असून ऑक्सिजन बेडची सुविधा याठिकाणी उपलब्ध नाही. लवेल येथे एकमेव खासगी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून, येथे ऑक्सिजन सुविधा असलेले दहा बेड रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची झपाट्याने वाढत असलेली संख्या विचारात घेता सद्य:स्थितीत असलेली २०० बेडची संख्या अपुरी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. १३ एप्रिलपर्यंत तालुक्यात २०५ ॲक्टिव्ह रुग्ण असून गेल्या दोन दिवसांत तब्बल ६० पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा अशाच पद्धतीने चढता राहिला तर रुग्णांना होम आयसोलेशन करण्याव्यतिरिक्त पर्याय आरोग्य विभागाकडे राहणार नाही.

शासकीय कोविड सेंटर क्षमता

घरडा सीसीसी १२०

खेड न.प. सीसीसी २०

कळंबणी एसडीएच ५०

एकूण १९०

खासगी घरडा हॉस्पिटल १०

ऑक्सिजन सुविधा

शासकीय ५०

खासगी १०

एकूण ६०

Web Title: Facility of 200 beds for Kovid patients in Khed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.