निवळी येथील नुकसानग्रस्त भागाची फडणवीस यांच्याकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:33 AM2021-05-21T04:33:17+5:302021-05-21T04:33:17+5:30
रत्नागिरी : तालुक्यातील निवळी येथील संजय केळकर यांच्या घराचे चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेले विरोधी ...
रत्नागिरी : तालुक्यातील निवळी येथील संजय केळकर यांच्या घराचे चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेले विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विराेधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गुरूवारी भेट देऊन पाहणी केली़ यावेळी केळकर यांच्याकडून वादळाची परिस्थिती जाणून घेतली.
तौक्ते चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस गुरुवारी जिल्हा दाैऱ्यावर आले हाेते़ खेड तालुक्यातून त्यांनी आपल्या पाहणी दाैऱ्याला सुरुवात केली़ त्यानंतर त्यांनी मुंबई-गाेवा महामार्गावरील निवळी गावाला भेट दिली़ याठिकाणचे संजय केळकर यांच्या नुकसानग्रस्त घराची त्यांनी पाहणी केली तसेच त्यांची विचारपूस करून त्यांना धीर दिला़ यावेळी त्यांच्यासमवेत आमदार प्रसाद लाड, माजी खासदार नीलेश राणे, भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, उमेश कुलकर्णी, मुन्ना चवंडे, सचिन करमरकर, विजय सालीम, दादा ढेकणे, ऐश्वर्या जठार, भाई जठार, निरंजन जठार, संजय निवळकर, नित्यानंद दळवी आदी उपस्थित होते.
--------------------------
रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील संजय केळकर यांच्या घराची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विराेधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पाहणी केली. (छाया : तन्मय दाते)