वणवे रोखण्यात अपयश

By admin | Published: February 12, 2015 11:53 PM2015-02-12T23:53:30+5:302015-02-13T00:54:18+5:30

कायद्याची गरज : नैसर्गिक साखळी येतेय धोक्यात

Failure to stop advertising | वणवे रोखण्यात अपयश

वणवे रोखण्यात अपयश

Next

फुणगूस : जिल्ह्यातील बहुतांश वणवे जानेवारी ते मे या काळात लागतात. या वणव्यात आंबा आणि काजूच्या बागा बेचिराख होतात. यातील बरेचसे वणवे मानवनिर्मित असतात. वणव्याचे वाढते प्रमाण पाहता पर्यावरण संरक्षणासाठी वणवा निर्मूलनात लोकसहभाग महत्त्वाचा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
जैवविविधतेने नटलेल्या भागात हजारो वनस्पती व प्राण्यांच्या जाती आपले अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्न करीत असतात. मात्र, अलिकडे डोंगर रांगांना वणव्यांचे गालबोट लागलेले दिसून येत आहे. पावसाळ्यापूर्वी शेतजमिनीवरील गवत नाहिसे होऊन शेती चांगली पिकावी, यासाठी भाजावळ केली जायची. याच आगीचे काही वेळेला वणव्यात रुपांतर होते. भडकत गेलेली आग आंबा, काजूच्या बागांना गिळंकृ त करते. त्यामुळे नैसर्गिक साखळी धोक्यात येत आहे.
वनक्षेत्रात वणवा लावणे, निष्काळजीपणामुळे लावलेली, लागलेली आग वनक्षेत्रात पसरणे, हा कायदेशीर गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. वणवे लावणाऱ्याविरोधात पूर्वी कायद्याने कोणती ना कोणती शिक्षा केली जात होती. मात्र, सध्या असे काही घडताना दिसत नाही.
वणव्यामुळे रानटी जनावरांचे व प्राण्यांचे या सहा महिन्यांचे खाद्य नष्ट होते. त्यामुळे त्यांच्या पैदासीवर, अनिष्ट परिणाम होतो. वातावरणातही मोठ्या प्रमाणात बदल होतो. पशु-पक्ष्यांची आश्रयस्थाने नष्ट होतात. गवतावर भूक भागवणारी भेकर, ससे, हरीण आदी प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येत असून, हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. दुसऱ्या बाजूला या प्राण्यांच्या जीवावर आपली भूक भागवणारे वाघ, कोल्हे, लांडगे यांसारख्या हिंस्त्र प्राण्यांनी आपला मोर्चा भक्ष्यशोधार्थ मानवी वस्तीकडे वळविला असून, त्यांच्याकडून जनावरांची शिकार केली जात आहे. त्यामुळे आधीच मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे. या वणव्यामुळे कोकणात निर्माण होणाऱ्या कृषी पर्यटक व्यवसायालाही फटका बसत आहे.
वणवा हा मुख्य मुद्दा ठरत आहे. हे लक्षात घेऊन सामाजिक वनीकरण विभागाच्या मदतीने पर्यावरणप्रेमी तसेच संघटनांमार्फ त वनक्षेत्रात वणवा निर्मूलन मोहीम व वनसंरक्षण अभियानाला सुरुवात केल्यास भविष्यात ओढवणाऱ्या आपत्तींना वेळीच आळा घालता येईल, असे मत व्यक्त केले जात अ्हे. नजिकच्या काळात वणवे लावण्याचे प्रमाण कमी होईल व जंंगलाचे संरक्षण केले जाईल असे मत व्यक्त होत आहे. (वार्ताहर)

लोकसहभाग महत्त्वाचा
रत्नागिरी जिल्ह्यात जानेवारी ते मार्च दरम्यान जोरदार वणवे लागतात. गेली अनेक वर्षे हा प्रकार सुरू असून, वणवे लावणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात अनेक डोंगरावर असे प्रकार केले जात असून, शासन यंत्रणा गप्प का, असा सवाल विचारला जात आहे. शेतजमीन अथवा जैवविविधता असलेल्या डोंगरावर असे वणवे लावण्याचे प्रमाण मोठे आहे.

Web Title: Failure to stop advertising

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.