रत्नकन्यांच्या यशाची प्रसिध्दी नक्कीच कौतुकास्पद : संदीप तावडे

By admin | Published: April 19, 2016 10:55 PM2016-04-19T22:55:39+5:302016-04-20T01:27:41+5:30

या ‘यशवंत’ मुलींचे कौतुक करण्यात ‘लोकमत’चा वाटा महत्त्वाचा आहे.

The fame of Ratnakarai's success is certainly appreciated: Sandeep Tawde | रत्नकन्यांच्या यशाची प्रसिध्दी नक्कीच कौतुकास्पद : संदीप तावडे

रत्नकन्यांच्या यशाची प्रसिध्दी नक्कीच कौतुकास्पद : संदीप तावडे

Next

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा सुरुवातीच्या काही काळात क्रीडा क्षेत्रामध्ये मागास जिल्हा म्हणून ओळखला जात असे. मात्र, आताच्या खेळाडूंनी आता तो इतिहास पुसून टाकला आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश मिळवत आहेत. या ‘यशवंत’ मुलींचे कौतुक करण्यात ‘लोकमत’चा वाटा महत्त्वाचा आहे. एखाद्या दैनिकाने स्वत: दखल घेऊन रत्नकन्यांचे यश प्रसिध्द करणे निश्चितच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र खो-खो संघाचे स्पर्धा निरीक्षक व जिल्हा खो - खो संघटनेचे सचिव संदीप तावडे यांनी केले. ‘लोकमत’ने प्रसिध्द केलेल्या ‘यश रत्नकन्यांचे’ मालिकेतील खेळाडू व भारताची सुवर्णकन्या ठरलेल्या ऐश्वर्या सावंत हिचा ‘लोकमत’ परिवारातर्फे सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी संदीप तावडे यांनी कौतुकोव्दार काढले. यावेळी क्रीडा प्रशिक्षक विनोद मयेकर, पंकज चवंडे, सूरज आयरे, ऐश्वर्याचे वडील यशवंत सावंत, रत्नकन्या ऐश्वर्या सावंत, श्रध्दा लाड, धनश्री लाड, अपेक्षा सुतार, आरती कांबळे, सोनिया भोसले, तन्वी कांबळे आदी मंडळी उपस्थित होती.
खेळाडू विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना तावडे यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीचेही आवाहन केले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना नेहमी वर्तमानपत्राचे वाचन महत्त्वाचे आहे. मोबाईल करमणूक म्हणून चांगला असला तरी सातत्याने वेळ काढून वर्तमानपत्र वाचून दैनंदिन घडामोडींबरोबर अन्य माहिती संकलित केली पाहिजे. मेहनत, जिद्द व परिश्रमातून असे यश मिळवा की, भविष्यात तुम्ही कोणाचे तरी ‘आयडॉल’ बना, असेही सांगितले. ‘लोकमत’च्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
मार्गदर्शक विनोद मयेकर व पंकज चवंडे यांनीही ‘लोकमत’च्या उपक्रमाचे कौतुक केले. धनश्री लाड हिने सर्वांचे आभार मानले. (प्रतिनिधी)

‘लोकमत’कडूनच दखल
राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या २९ रत्नकन्यांच्या कौतुकाची मालिका केवळ ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली. हे कौतुक खेळाडूंना अधिक प्रोत्साहन देईल, अशा शब्दात संदीप तावडे व व अन्य क्रीडा शिक्षकांनी ‘लोकमत’चे विशेष अभिनंदन केले.

Web Title: The fame of Ratnakarai's success is certainly appreciated: Sandeep Tawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.