प्रशासकीय सेवेत जाण्याचे शेतकरी कन्येचे स्वप्न, सत्काराने भारावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 11:58 AM2019-06-01T11:58:39+5:302019-06-01T11:59:54+5:30

वर्षभर महाविद्यालयाच्या बाहेर इतर शिकवण्या लावूनही बारावीला ८० टक्क्यांच्या पुढे जाणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. पण करबुडे (ता. रत्नागिरी) येथील सोनल सुभाष धनावडे या शेतकरी कन्येने कुठल्याही शिकवणीविना बारावी कला शाखेमध्ये तब्बल ८९ टक्के गुण मिळवत आपल्या कुटुंबाबरोबरच शाळा - महाविद्यालयाचीही मान उंचावली आहे. दरम्यान, सोनलला प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा आहे.

Farmers are relieved of the dreams of the daughter and the hospitality to go to the administrative service | प्रशासकीय सेवेत जाण्याचे शेतकरी कन्येचे स्वप्न, सत्काराने भारावली

प्रशासकीय सेवेत जाण्याचे शेतकरी कन्येचे स्वप्न, सत्काराने भारावली

Next
ठळक मुद्देप्रशासकीय सेवेत जाण्याचे शेतकरी कन्येचे स्वप्न, सत्काराने भारावलीकरबुडेच्या सोनल धनावडेने बारावीत मिळवले ८९ टक्के, श्रेय आई - वडील व शिक्षकांना

शोभना कांबळे 

रत्नागिरी : वर्षभर महाविद्यालयाच्या बाहेर इतर शिकवण्या लावूनही बारावीला ८० टक्क्यांच्या पुढे जाणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. पण करबुडे (ता. रत्नागिरी) येथील सोनल सुभाष धनावडे या शेतकरी कन्येने कुठल्याही शिकवणीविना बारावी कला शाखेमध्ये तब्बल ८९ टक्के गुण मिळवत आपल्या कुटुंबाबरोबरच शाळा - महाविद्यालयाचीही मान उंचावली आहे. दरम्यान, सोनलला प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा आहे.

सोनल रत्नागिरीतील अभ्यंकर - कुलकर्णी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिचे प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण करबुडे येथे झाले. दहावीलाही तिला ९३.२० टक्के गुण मिळाले होते. त्याचे श्रेय पूर्णपणे करबुडे येथील माध्यमिक विद्यामंदिरचे शिक्षक, आपले आई - वडील, काका आणि मुख्य म्हणजे आपल्या आजोबांना असल्याचे तिने आवर्जुन सांगितले. याच शाळेत तिचे गायन, नृत्य तसेच इतर छंद जपण्यासाठी प्रोत्साहन मिळाल्याचे ती सांगते.

सोनलला लहानपणापासूनच शिक्षकी पेशाचे आकर्षण आहे. तिचे वडील सुभाष धनावडे हे शेतमजुरी करतात तर मोठा भाऊ संदेश याने बारावीनंतर शिक्षण थांबवून वडिलांना मदत व्हावी, यासाठी रत्नागिरीतील एका दुकानात काम मिळवले. पूर्वी सातवी इयत्ता पूर्ण झाल्यानंतर शिक्षक होता येत असे. त्यामुळे तिचे आजोबा बाळू धनावडे हे सातवी शिकल्यानंतर शिक्षकी पेशात आले. त्यामुळे त्यांची प्रेरणा सोनमला मिळत गेली. आठवीत असतानाही तिला राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली होती.

दहावीला असताना तिला शाळेत जाण्या - येण्यासाठी १५ ते २० मिनिटे चालावे लागे, तेही आडवाटने. पण अभ्यास हेच ध्येय ठेवल्याने ती पहाटे अगदी पाच वाजता उठत असे. अभ्यास करतानाच शेतीची कामे, घरकामात आईला मदत करत असे. दहावी झाल्यानंतर मात्र शाळेत येणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे तिला प्रशासकीय सेवेच्या संधीबाबत माहिती मिळू लागली. पुढे काय करायचे, असा निर्णय घेताना गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे पदवीधर असलेले तिचे काका यांची तिला खूप मदत झाली. तिने अभ्यंकर - कुलकर्णी महाविद्यालयात अकरावी कला शाखेत प्रवेश घेतला. उत्तम गुण असतानाही तिने कला शाखेत प्रवेश का घेतला, अशी विचारणा अनेकांनी केली. पण तिचा निर्धार कायम होता.

गेल्या दोन वर्षात तिने मेहनत घेऊन अभ्यास केला आणि त्याचे सार्थकही झाले. सोनलला बारावीला ८९ टक्के गुण मिळाले आहेत. आता यापुढील अभ्यास करतानाच ती स्पर्धा परीक्षांची तयारीही करणार आहे. प्रशासकीय सेवेत मोठ्या पदावर पोहोचण्याचे तिचे स्वप्न तिला पूर्ण करायचे आहे, तिला स्वत:ची वेगळी ओळख बनवायची आहे व त्यासाठी परिश्रम करण्याची तिची तयारी आहे. तिने त्यासाठी प्रयत्नही सुरू केले.


जिद्द मनात कायमची

सोनलचे ८० वर्षीय आजोबा दररोज घरी येणाऱ्या वृत्तपत्रांतील बातम्यांद्वारे तिला सतत प्रोत्साहन देत. यामुळे आपणही असे यश मिळवायचेच, ही जिद्द सोनलच्या मनात कायम राहिली. म्हणूनच दहावीला असतानाही तिच्या शिक्षकांनी सर्वच मुलांबरोबर तिला केलेले मार्गदर्शन आणि आजोबांचे प्रोत्साहन यामुळे आपण नक्कीच ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणार, असा तिला विश्वास होता. त्या बळावरच तिने दहावीला ९३ टक्के गुण मिळवले.



ग्रामीण भागातील शाळा शहरातील शाळांपेक्षा कुठेही कमी नाहीत. या शाळांमधील शिक्षक अजूनही मुलांसाठी मेहनत घेतात, मनापासून मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांनीच मनापासून अभ्यास करण्याची तयारी ठेवायला हवी. अभ्यासात यश आपोआप मिळत जाते. मेहनत केली की त्याचे फळ निश्चितच चांगले मिळते.
- सोनल धनावडे

Web Title: Farmers are relieved of the dreams of the daughter and the hospitality to go to the administrative service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.