अनुदानाचा लाभ घेणारे शेतकरी घटले, रोजगार हमी योजना रेंगाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:41 AM2019-12-17T11:41:33+5:302019-12-17T11:47:43+5:30

शेतकरी यावर्षी कमी संख्येने फळबाग लागवडीकडे वळल्याने लागवडीचे क्षेत्र कमी झाले आहे. गेल्या दोन वर्षांपेक्षा यावर्षी रोजगार हमी योजनेच्या अनुदानाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे.

Farmers benefiting from subsidy fell, employment guarantee schemes collapsed | अनुदानाचा लाभ घेणारे शेतकरी घटले, रोजगार हमी योजना रेंगाळली

अनुदानाचा लाभ घेणारे शेतकरी घटले, रोजगार हमी योजना रेंगाळली

Next
ठळक मुद्देअनुदानाचा लाभ घेणारे शेतकरी घटले, रोजगार हमी योजना रेंगाळली ग्रामसेवकांच्या असहकार्य आंदोलनाचा परिणाम

रत्नागिरी : शेतकरी यावर्षी कमी संख्येने फळबाग लागवडीकडे वळल्याने लागवडीचे क्षेत्र कमी झाले आहे. गेल्या दोन वर्षांपेक्षा यावर्षी रोजगार हमी योजनेच्या अनुदानाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे.

फळबाग लागवड रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राबविणारा रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या प्रयत्नामुळे प्रारंभीच्या दोन वर्षात केवळ रत्नागिरीतच १० हजार हेक्टर पडीक क्षेत्रावर लागवड झाली होती.

२०१७ -१८ साली जिल्ह्यात नऊ पंचायत समित्यांच्या माध्यमातून १९३२.३० हेक्टर क्षेत्रावर, तर कृषी विभागाने ३०५१.३० अशी पाच हेक्टर हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड केली होती. सन २०१८ - १९ या वर्षातही पंचायत समिती आणि कृषी विभाग यांनी एकत्रित मिळून ५८९४ हेक्टरवर फळबाग लागवड झाली होती.

मात्र, २०१९-२० या वर्षात या योजनेच्या सुरूवातीपासून जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी या योजनेला असहकार्य करण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींतील फळबाग मोहिमेला खीळ बसली आहे. पंचायत समित्यांना दिलेले यावर्षीचे एकूण ८२६.४० हेक्टर आणि १३४३ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट अपूर्ण राहिले असून केवळ ३०१.२५ हेक्टर क्षेत्रावरच यावर्षी लागवड झाली असून, १३४३ लाभार्थ्यांपैकी केवळ ४०७ लाभार्थ्यांचेच उद्दिष्ट पुर्ण झाले आहे.

यावर्षी ग्रामसेवकांनीच या राष्ट्रीय कामाला असहकार दर्शविल्याने जिल्ह्यात पंचायत समित्यांच्या माध्यमातून केवळ ३० टक्केच काम झाले आहे. यावर्षी ३०० हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली असून, शेतकऱ्यांच्या संख्येत घट झाली. केवळ ४०७ शेतकऱ्यांना या योजनेच्या अनुदानाचा लाभ मिळाला आहे. या योजनेच्या तिसऱ्या वर्षी जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत या सर्व शेतकऱ्यांना ३ कोटी ७१ लाख ३८ हजार रूपयांचेच वाटप झाले.

कृषी सहाय्यक

यावर्षी कृषी सहाय्यकांनीच हातभार लावत ही योजना पुढे नेली आहे. यावर्षी कृषी विभागाला ५४६९ हेक्टर क्षेत्र आणि ८११८ लाभार्थी एवढे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ३७८९ हेक्टर क्षेत्रावर लागवड आणि ५९६६ लाभार्थ्यांना या योजनेच्या निधीचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षीचे कृषी विभागाने लाभार्थ्यांचे ७३ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

धावून आले मदतीला

दोन वर्षे अतिशय गती घेतलेल्या राष्ट्रीय रोजगार हमी योजनेला यावर्षी खीळ बसल्याने सलग दोन वर्षे ९ हजारपेक्षा अधिक असलेल्या लाभार्थ्यांना २१ कोटीपेक्षा अधिक निधीचे वाटप झाले होते, यावर्षी केवळ ४०७ शेतकऱ्यांना ३ कोटी ७१ लाख एवढ्या निधीचा लाभ घेता आला. ग्रामसेवकांच्या असहकार्यामुळे फळबाग लागवडीला फटका बसला.

Web Title: Farmers benefiting from subsidy fell, employment guarantee schemes collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.