शेतकऱ्यांना मिळणार भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:21 AM2021-06-19T04:21:30+5:302021-06-19T04:21:30+5:30
देवरूख : तौक्ते चक्रीवादळाने संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी ...
देवरूख : तौक्ते चक्रीवादळाने संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाकडून करण्यात आले आहेत. यात प्रलंबित राहिलेल्या धामापूर येथील १५ शेतकऱ्यांना लवकरच भरपाई मिळणार आहे.
विद्यार्थी परिषदेकडून डबे
रत्नागिरी : एप्रिल आणि मे महिन्याच्या कालावधीत कोरोना रुग्णांची संख्या भरमसाठ वाढली. या काळात रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्या जेवणाचे हाल हाेत होते. हे लक्षात घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गरजूंना २९ एप्रिल ते ३ जून या कालावधीत नि:शुल्क जेवणाचे डबे पोहोचविले.
जनजीवन विस्कळीत
दापोली : मुसळधार पावसामुळे हर्णे, पाळंदे, मुरूड गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. मंगळवारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तालुक्यात अनेक भागात घरे, गोठ्यांची पडझड झाली आहे.
हवेत गारठा
राजापूर : गेला आठवडाभर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असून, तापमानाचा पारा खाली आल्याने वातावरणात कमालीचा गारठा वाढला आहे. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील पाण्याचे विविध स्त्रोत पूर्णपणे भरले आहेत.
बिबट्याचा धसका
दापोली : येथील रहिवासी स्वप्निल महाकाळ यांचे पाळीव श्वान रात्रीच्या वेळी बिबट्याने उचलून नेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही महिन्यांपूर्वी महाकाळ यांच्या शेजाऱ्यांचे श्वान वाघाने नेले होते. घटनेची पुनरावृत्ती घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.