कूळ वहिवाटीसाठी उपोषण

By admin | Published: April 5, 2016 12:40 AM2016-04-05T00:40:22+5:302016-04-05T00:40:22+5:30

विष्णू आमरेंचा इशारा : तहसीलदारांकडून झालेली नोंद सातबाऱ्यावर नाही

Fasting for the Descent | कूळ वहिवाटीसाठी उपोषण

कूळ वहिवाटीसाठी उपोषण

Next

 देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली येथील विष्णू धोंडू आमरे यांचे सातबारा दप्तरी कूळ वहिवाटदार म्हणून नाव लावले जाईल, असे आश्वासन देऊनही तहसील कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली येथील विष्णू धोंडू आमरे हे १० एप्रिलपासून उपोषणाला बसणार आहेत. एक महिना यासाठी शासनाला आमरे यांनी अवधी दिला होता. या दरम्यान त्यांचे साखळी उपोषण सुरूच होते.
अंत्रवली येथील विष्णू धोंडू आमरे कुटुंबियांनी साखळी उपोषण फेब्रुवारी महिन्यात सुरू केले होते. सुरूवातीला शासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर उपोषणाची तीव्रता वाढताच अखेर या उपोषणाची दखल घेत तहसीलदार वैशाली माने यांनी सातबारावर २ मार्च रोजी विष्णू आमरे यांच्या नावाची नोंद करून दिली होती. यामुळे आमरे यांनी उपोषण स्थगित केले होते.
मात्र, साताबाऱ्यावर आजतागायत कूळ वहीवाटदार म्हणून नोंद करण्यात आलेली नाही. ही नोंद त्वरित न झाल्यास १५ मार्च रोजी पुन्हा उपोषण करण्याचा इशारा आमरे यांनी दिला होता.
या कालावधीतही प्रत्यक्षात कूळ वहिवाटदार म्हणून नोंद करण्यात आली नाही. आमरे यांचे वडील धोंडू राघो आमरे यांचे कुळवहीवाटदार म्हणून १९५६ सालापासून १९८० सालापर्यंत नाव होते. अचानक धोंडू राघो आमरे यांचे नाव न लावता इब्राहीम काका उपाध्ये जमीन कसतो असे दाखवून सन १९९१ ते १९९९पर्यंत इब्राहिम काका उपाध्ये असे नाव लावण्यात आले. इब्राहीम काका उपाध्ये हा इसम २४ जून १९७१ साली मयत असून, तो १९९१ पासून १९९९ पर्यंत जमीन कसण्यासाठी कसा आला याची चौकशी होऊन माहिती मिळावी, असे निवेदन आमरे यांनी तहसीलदारांना सादर केले होते.
सन २००३ ते २०१५पर्यंत नायब तहसीलदार यांच्या आदेशाने कूळ वहीवाटदार म्हणून विष्णू धोंडू आमरे यांचे नाव लावण्यात आले. तरीही २० एप्रिल २०१५ रोजी सातबारा उतारा प्रत्यक्षात आमरे यांना का देण्यात आला नाही, याचीही चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
सन २०१६च्या नेटवरील सातबारा उताऱ्यामध्ये विष्णू धोंडू आमरे यांचे नाव वगळण्यात आले. याबाबत आमरे कुटुंबियांना तहसीलदारांकडून न्याय न मिळाल्याने अखेर त्यांनी साखळी उपोषणाचा निर्णय घेतला.
आमरे कुटुंबियांनी लोकशाही मार्गाने उपोषण केल्यानंतर तहसीलदार माने यांनी या उपोषणाची दखल घेत विष्णू आमरे यांना देवरूख तहसील कार्यालयात निमंत्रित केले. यावेळी आमरे यांच्याशी माने यांनी सखोल चर्चा केली. यानुसार सातबारा दप्तरी विष्णू आमरे यांच्या नावाची नोंद करून तसा सातबारा देण्यात आला. मात्र, या सातबाऱ्यात कूळ वहिवाटदार म्हणून आमरे यांची नोंद झालेली नाही. ही नोेंद १५ फे ब्रुवारीपूर्वी व्हावी, अशी मागणी आमरे यांनी तहसीलदारांकडे केली होती.
यावेळी तहसीलदारांनी या नोंदीसाठी काही कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना आमरे यांना केल्या होत्या. या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही आमरे यांच्या नावाची नोंद न झाल्याने अखेर १० एप्रिलपासून उपोषणाचा इशारा विष्णू आमरे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
अनेक त्रुटी : आॅनलाईन सातबारा अद्ययावत नसल्याने गोंधळ
शासनाने आॅनलाईन सातबारा देण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. याद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक तलाठी कार्यालयात सातबारा संगणकीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आॅनलाईन सातबाऱ्यात अनेक त्रुटी आहेत. सन २०१२ नंतर सातबारा अद्ययावत करण्यात आले नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. त्यात अजून सुधारणाच झालेली नाही.

Web Title: Fasting for the Descent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.