आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी समविचारी मंचचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 05:14 PM2020-12-14T17:14:54+5:302020-12-14T17:16:41+5:30
CoronaVirusUnlock, Ratnagirinews, Health, Collcatoroffice, कोरोना काळात काम केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची कायम स्वरुपी थेट सेवा भरती करुन त्या - त्या उमेदवारांना त्या - त्या जिल्ह्यात नेमणूक द्यावी या मागणीसाठी समविचारी मंचातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण केले.
रत्नागिरी : कोरोना काळात काम केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची कायम स्वरुपी थेट सेवा भरती करुन त्या - त्या उमेदवारांना त्या - त्या जिल्ह्यात नेमणूक द्यावी या मागणीसाठी समविचारी मंचातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण केले.
या महाराष्ट्र समविचारी मंचातर्फे राज्यभर हे आंदोलन करण्यात येणार असून, त्याची सुरूवात सोमवारी रत्नागिरीतून करण्यात आली. राज्यातील महाराष्ट्र समविचारी मंचचे पदाधिकारी आपआपल्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणीची सुरुवात करुन संभाव्य लढ्याला सुरुवात केली आहे
या उपोषणात समविचारी मंचचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. समविचारी मंचचे बाबा ढोल्ये, राज्य सरचिटणीस संजय पुनसकर,महासचिव श्रीनिवास दळवी,जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर, युवा प्रमुख ॲड. नीलेश आखाडे, तालुकाध्यक्ष डॉ. सुजय लेले, साधना भावे आदींनी हे उपोषण यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली आहे.