दुर्दैवी! विजेच्या धक्क्याने बापलेक ठार; रत्नागिरीतील पुजारी कुटुंबावर शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 11:01 PM2020-10-02T23:01:51+5:302020-10-02T23:02:06+5:30

Electric shock death Ratnagiri News: नाणारमधील चिवारवाडी येथील रहिवासी असलेले पुजारी नाणार ग्रामपंचायतीमध्ये शिपाई म्हणून काम करतात.

Father & Son Death by electric shock in Ratnagiri | दुर्दैवी! विजेच्या धक्क्याने बापलेक ठार; रत्नागिरीतील पुजारी कुटुंबावर शोककळा

दुर्दैवी! विजेच्या धक्क्याने बापलेक ठार; रत्नागिरीतील पुजारी कुटुंबावर शोककळा

Next

राजापूर : खेकडे पकडण्यासाठी वहाळावर गेलेले बापलेक विजेची तार पाण्यात पडल्याने शॉक लागून जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील नाणार येथे शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता घडली. दिवाकर पुजारी (४२) आणि त्यांचा १0 वर्षांचा मुलगा अथर्व यांचा यात दुर्दैवी अंत झाला.

नाणारमधील चिवारवाडी येथील रहिवासी असलेले पुजारी नाणार ग्रामपंचायतीमध्ये शिपाई म्हणून काम करतात. शुक्रवारी सायंकाळी ते आपल्या मुलगा अथर्व आणि गावातील अन्य दोन मुलांसह खेकडे पकडण्यासाठी गिरमादेवी वहाळ येथे गेले होते. खेकडे पकडण्यासाठी दिवाकर आणि अथर्व पाण्याच्या प्रवाहात भांडी लावत होते. त्याचवेळी वहाळावरून जाणाºया ११ केव्ही क्षमतेच्या विजेच्या तारेचा कंडक्टर तुटला आणि वीज प्रवाहीत असलेली तार पाण्यात पडली. त्यामुळे दिवाकर आणि त्यांचा मुलगा यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यांच्यासोबतच्या मुलांनी तत्काळ या घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यांनी पोलीस स्थानक तसेच तहसील कार्यालयाला ही माहिती कळवली. महावितरण कंपनीचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी रवाना झाले आहेत.

Web Title: Father & Son Death by electric shock in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज