कोरोनाने मृत्यू झाल्याने मुलाने नाकारल्या वडिलांच्या अस्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:28 AM2021-04-26T04:28:31+5:302021-04-26T04:28:31+5:30
दापोली / शिवाजी गोरे : काेराेना झालेल्या व्यक्तीला समाजात याेग्य प्रकारची वागणूक मिळत नाही, हे अनेकवेळा दिसून येते; पण ...
दापोली / शिवाजी गोरे : काेराेना झालेल्या व्यक्तीला समाजात याेग्य प्रकारची वागणूक मिळत नाही, हे अनेकवेळा दिसून येते; पण काेराेनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्याही वाट्याला उपेक्षा येत असल्याचे विदारक चित्र समाेर येत आहे. काेराेनाने मृत्यू झाल्याने मुलाने आपल्या वडिलांच्याच अस्थी नाकारल्याचा प्रकार दापाेलीत शनिवारी घडला. या प्रकारामुळे काेराेनाबाबत लाेकांची मानसिकता बदलली नसल्याचेच दिसत आहे.
दापाेली तालुक्यात काेराेनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच मृत्यू हाेण्याचे प्रमाणही वाढत आहे. तालुक्यातील काेणत्याही गावातील व्यक्तीचा काेराेनामुळे मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीला दापाेलीतील स्मशानभूमीत नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडून अग्नी देण्यात येताे. निधनानंतर काेणा नातेवाइकांना अंत्यविधी करायचे असेल तर पूर्वपरवानगीने पीपीई कीट घालून अग्नी देण्याची मुभा दिली जाते. तसेच नातेवाइकांना अस्थी हव्या असल्यास त्या दिल्या जात आहेत. शनिवारीही तालुक्यात काही काेराेनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यामध्ये तालुक्यातील एका खेडेगावातील व्यक्तीचाही समावेश हाेता. अंत्यसंस्कारासाठी नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी मृतदेह स्मशानभूमीत आणले. यावेळी गावातील एका व्यक्तीच्या नातेवाइकांना अंत्यसंस्काराबाबत विचारणा करण्यात आली. मात्र, त्यांनी त्याला नकार देऊन अग्नी देण्यास सांगितले.
नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी अग्नी दिल्यानंतर तुम्हाला हवे असतील तर अस्थी घेऊन जाऊ शकता असेही सांगण्यात आले. परंतु, आम्हाला अस्थी नको, असे मृत व्यक्तीच्या मुलाने सांगितले. त्यानंतर त्याच्यासमवेत आलेल्या नातेवाइकांनी तेथून काढता पाय घेतला.
कोरोनाची भीती माणसाच्या मनात इतकी घर करून बसली आहे की, मृत्यूपश्चातही काही महत्त्वाचे
विधी करण्यासाठी नात्यातील मंडळी नाखूश असल्याचे पाहायला मिळते. काेराेनामुळे माणसा-माणसांतील दुरावा वाढला असून, माणुसकी हरपल्याची भावना निर्माण झाली आहे. काेराेनामुळे मृत्यू झालेल्यांच्या अंत्यविधीसाठी जात, धर्म न पाहता अनेकजण पुढे येत आहेत, तर नात्यातील माणसे भीतीपाेटी आपल्याच माणसाला दूर लाेटत आहेत, हे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.
......................................
दापाेली नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांतर्फे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.