चिपळुणातील १५६ घरांत ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:24 AM2021-07-17T04:24:59+5:302021-07-17T04:24:59+5:30

संदीप बांद्रे चिपळूण : सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूण व डाऊ केमिकल इंटरनॅशनल प्रा. लि. व चिपळूण नगर परिषदेच्या सहकार्याने ...

Fertilizer production from wet waste in 156 houses in Chiplun | चिपळुणातील १५६ घरांत ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती

चिपळुणातील १५६ घरांत ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती

googlenewsNext

संदीप बांद्रे

चिपळूण : सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूण व डाऊ केमिकल इंटरनॅशनल प्रा. लि. व चिपळूण नगर परिषदेच्या सहकार्याने चिपळूणमध्ये १२२ घरांत ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याचे काम यशस्वीपणे सुरू आहे. शहरात डिसेंबर २०२० मध्ये हा प्रकल्प सुरू झाला असून, चार व्यक्तींच्या कुटुंबासाठी १३५ लिटरचा व त्यापेक्षा जास्त व्यक्तींसाठी २०० लिटरचा प्लास्टिक ड्रम पुरविण्यात आला आहे. त्याआधारे १५६ घरांमध्ये ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती सुरू आहे.

नारळाची सोडणे, पालापाचोळा व कुजलेले शेणखत घालण्यात आले होते. प्रत्येक घरामध्ये संस्थेचा माणूस जाऊन प्रत्यक्ष ओला कचरा कसा टाकावा, कसा हलवावा, त्यामध्ये अन्य घटक किती व कसे वापरावे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर दर आठवड्याला प्रत्येक घरात जाऊन सेंद्रिय खताबरोबर होत आहे की, नाही याचा आढावा घेतला जात आहे. वेळोवेळी गरजेनुसार विशेष मार्गदर्शन करण्यात आले. कंपोस्ट करण्यासाठी इनोरा बायोटेक पुणे यांचे कल्चर, ट्रायकंपोस्ट व आय.व्ही.इ.एम.सो वापरला जातो. याचा एका कुटुंबासाठी महिन्याचा खर्च फक्त २० रुपये आहे. याबाबत संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी इनोरा यांच्याकडे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्याचबरोबर या सर्व सदस्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप बनविण्यात आला असून, वेळोवेळी ग्रुपवरून मार्गदर्शन करण्यात येते. स्वरविहार गृह संकुलमध्ये १५६ सदनिकांसाठी सोसायटी कंपोस्टिंग सुरू असून, तेथे ओला कचरा खत निर्मितीसाठी दिला जातो. या सर्व सदस्यांनी आपल्या घरातील प्लास्टिक कचराही साठवून ठेवायला सुरुवात केली असून, सर्व प्रकारचे प्लास्टिक पाच रुपये दराने संस्थेतर्फे घेण्यात येताे.

-----------------------------

चिपळुणातील सेंद्रिय खत प्रकल्पात गृहिणींनी सक्रिय सहभाग घेतला आहे.

150721\4800img-20210715-wa0020.jpg

चिपळुणातील १२२ घरात ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती

Web Title: Fertilizer production from wet waste in 156 houses in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.