आगीत ६०० जनावरांचा चारा जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 12:55 PM2020-04-23T12:55:07+5:302020-04-23T12:57:05+5:30
अचानक लागलेल्या आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्याआधीच संपूर्ण चार जळून खाक झाला. संपूर्ण चाराच जळून खाक झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आवाशी : खेड तालुक्यातील धामणदेवी(लोटे) येथे असलेल्या गोशाळेच्या चारा डेपोला गुरूवारी पहाटे ३ च्या सुमाराला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत सुमारे ६०० जनावरांचे खाद्य जळून खाक झाले आहे.
धामणदेवी लोटे परशुराम येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थान संचलित गोशाळा आहे. या गोशाळेतील ३ चारा डेपोंना गुरूवारी पहाटे लागलेल्या आगीत जळून गेलेल्या चाऱ्यामुळे आता ६०० जनावरांच्या खाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
अचानक लागलेल्या आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्याआधीच संपूर्ण चार जळून खाक झाला. संपूर्ण चाराच जळून खाक झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे लोकांनीच पुढाकार घेऊन आता जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवावा असे आवाहन गोशाळेचे संचालक भगवान कोकरे यांनी केले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.