काेरोनाशी लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:39 AM2021-09-16T04:39:22+5:302021-09-16T04:39:22+5:30
२. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून दक्षता बाळगण्यात येत आहे. त्यासाठी सध्या कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यावर आरोग्य विभागाने ...
२. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून दक्षता बाळगण्यात येत आहे. त्यासाठी सध्या कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यावर आरोग्य विभागाने अधिक भर देणे आवश्यक आहे. त्यातच गणेशोत्सवानिमित्ताने लाखो चाकरमानी जिल्ह्यात आले आहेत, तरीही कोरोना चाचण्यांची संख्या वाढल्याचे दिसत नाही. शासनाच्या आदेशानुसार जास्तीतजास्त कोरोना चाचण्या करणे आवश्यक आहे. मात्र, सध्या चार हजारांपर्यंतच कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत.
३. गणेशोत्सवाच्या कालावधीत चाकरमान्यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल, अशी चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, आरोग्य यंत्रणा, प्रशासनाने चोख कामगिरी बजावल्याने आजपर्यंत कोरोनाची स्थिती मागील महिन्यापेक्षा कमी असून, रुग्णांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही, तसेच जिल्ह्यात कोरोनाने मृत्यूचे प्रमाणही फार कमी झाले आहे, तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरणावरही शासनाकडून भर देण्यात आला आहे. जास्तीतजास्त लोकांना लस दिली जात आहे. लोकांनाही आता लसीचे महत्त्व पटले आहे.