कोरोनाशी लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:20 AM2021-07-19T04:20:53+5:302021-07-19T04:20:53+5:30
२. खेड शहरातील भडगाव खोंडे ग्रामपंचायतीत करण्यात आलेल्या कोविड लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळाला. सरपंच प्रमोद बैकर व शाखा ...
२. खेड शहरातील भडगाव खोंडे ग्रामपंचायतीत करण्यात आलेल्या कोविड लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळाला. सरपंच प्रमोद बैकर व शाखा प्रमुख किरण डफळे यांनी पाठपुरावा करून कोविशिल्ड लसीकरण आयोजित केले होते. प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या लसीकरणात खोंडे ग्रामस्थांचा सहभाग होता. लवकरच मडगावसाठीसुद्धा लसीकरण आयोजित करण्यात येणार आहे. हे लसीकरण फुरुस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी जागृती पवार, जि.प. सदस्य चंद्रकांत कदम यांच्या मागणीनुसार आयोजित केले होते.
३. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एन.बी. पाटील यांनी कोरोना चाचणीवर अधिक भर देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार शनिवारी चिपळूण शहर बाजारपेठेतील १२२ व्यापारी व कामगारांची दोन मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून अँटिजन तपासणी करण्यात आली. यामध्ये १५ जण कोरोनाबाधित आढळून आले. सद्य:स्थितीत तालुक्यात ७३८ बाधित रुग्ण असून, त्यापैकी ५६४ जणांना कोणतीही लक्षणे नाहीत, तसेच १७४ जण उपचार घेत आहेत. बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.