कोरोनाशी लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:33 AM2021-08-26T04:33:34+5:302021-08-26T04:33:34+5:30
२. कोरोनाने आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर अनाथ झालेल्या लांजा तालुक्यातील कुर्णे पड्येवाडी येथील तीन निराधार मुलांसोबत लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ...
२. कोरोनाने आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर अनाथ झालेल्या लांजा तालुक्यातील कुर्णे पड्येवाडी येथील तीन निराधार मुलांसोबत लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जीवलग टीमने रक्षाबंधन साजरे केले. रमेश दाभोळकर यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने त्यांची तीन मुले अनाथ झाली आहेत. या तिन्ही मुलांची जबाबदारी स्वीकारताना राष्ट्रवादीच्या जीवलग टीमने त्यांचे पालकत्व घेतले आहे.
३. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत; मात्र मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहेत. खेड तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्याही वाढलेली आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोरोनाचे आणखी ८ रुग्ण तालुक्यात आढळले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या ६,१६४ झाली आहे. सद्यस्थितीत १०० रुग्ण सक्रिय असून, त्यामध्ये १४ वर्षांपर्यंतच्या १६ मुलांचा समावेश आहे. अजूनही कोरोनाचा संसर्ग लहान मुलांना होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.