कोरोनाशी लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:38 AM2021-09-08T04:38:11+5:302021-09-08T04:38:11+5:30
२) जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्हीही लसींचा पुरवठा राज्य सरकारकडून मुबलक प्रमाणावर होऊ लागला आहे. त्यामुळे ...
२) जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्हीही लसींचा पुरवठा राज्य सरकारकडून मुबलक प्रमाणावर होऊ लागला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने लसीकरण केंद्रांमध्ये वाढ केली असून, सध्या सुमारे १५० केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविली जात आहे, तसेच १८ ते २९ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा टक्काही वाढू लागला आहे. त्यामुळे लवकरच या वयोगटाचे लसीकरण होण्याची शक्यता आहे.
३) गणेशाेत्सवासाठी जिल्ह्याबाहेरून इतर भागांतून येणाऱ्या नागरिकांची संख्या माेठ्या प्रमाणावर आहे. येणारे गणेशभक्त काेकण रेल्वेच्या माध्यमातून अधिक संख्येने येणार आहेत, हे लक्षात घेऊन काेकण रेल्वे प्रशासनाने प्रत्येक स्थानकावर काेराेनाच्या चाचणीची सुविधा उपलब्ब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे रेल्वेची संख्याही वाढविण्यात आली आहे. गर्दी हाेऊ नये याकरिता या सर्व गाड्यांचे आगाऊ आरक्षण करणे अनिवार्य केले आहे.