कोरोनाशी लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:29 AM2021-07-26T04:29:04+5:302021-07-26T04:29:04+5:30
२. राजापूर तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी यांच्या आवाहनानुसार, आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या संयुक्त विद्यमाने ...
२. राजापूर तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी यांच्या आवाहनानुसार, आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या संयुक्त विद्यमाने पाचल - मुस्लिमवाडी येथे पाचल ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोना चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी नवीन पथक तयार करण्यात आले होते. यावेळी मुस्लिमवाडीतील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. त्यामुळे एकूण ४०५ ग्रामस्थांच्या चाचण्या करण्यात यश आले. यावेळ अफजल पाटणकर, काशिम गडकरी, आरोग्यसेवक, आरोग्य सहाय्यक व अन्य लाेकांनी सहकार्य केले.
३. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोना चाचण्या कमी करण्यात आल्याचे दिसून आले आहे. चाचण्या कमी करण्यात आल्याने नव्या संकटाला निमंत्रण देत असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या करुन रुग्णांना उपचारासाठी दाखल करणे, त्यांचे विलगीकरण करणे आवश्यक असते. मात्र, चाचण्यांच्या कमी होणाऱ्या प्रमाणामुळे रुग्णांची नोंद कमी होत आहे. याचा परिणाम म्हणून कोरोनाचा फैलाव अधिक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.